<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील चंदूआण्णा नगराजवळील पोलिस काॅलनीत पंचशील ध्वजस्तंभाजवळच्या मैदानावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम तासभर चालला. सुरूवातीला प्रा.भिमराव सपकाळे यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सर्वांना भिमराव सपकाळे व दिपक तायडे यांनी बुद्धवंदना दिली. या प्रसंगी कवी आर जे सुरवाडे यांनी ” विठ्ठलवाडी ची व्यथा” ही कविता सादर केली. आबा मगरे यांनी विचार मांडले. श्रावण सपकाळे यांनी कार्यक्रमात सातत्य राहावे हा विचार मांडला. किरण इंगळे व सुनिल इंगळे यांनी संपर्क वाढवावा असे विषद केले. विनोद कांबळे यांनी जागृती वाढवावी अशी सुचवा केली. नारे दादा यांनी समाज चळवळीपासून लांब चालला आहे ही खंत व्यक्त केली. सोनवणे यांनी त्यास अनुमोदन दिले. आयोजनासाठी भरत सोयंके, अमोल वाघमारे, दिपक तायडे यांनी परिश्रम घेतले. वंदनेत लकी तायडे या विद्यार्थ्यांसह सिताबाई तायडे व अलका इंगळे या महिलांचा सहभाग होता. यावेळी पुढील नियोजन करण्यात आले. शेवटी रविंद्र जंजाळे यांनी आभार प्रदर्शन केले.