<
विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समता सैनिक दल जळगांव शाखेच्या वतीने दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता सिव्हिल हॉस्पिटल समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जिल्हाध्यक्ष विजय निकम यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभेला सुरवात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अथक परिश्रम – त्याग – संघर्ष – करून हक्क अधिकार मिळून दिले आहे. यांची जाणीव ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित सामाजिक – राजकीय – धार्मिक क्रांती घडवून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. समता सैनिक दला तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा शेड्युल कास्ट फेडरेशन हा पक्ष बरखास्त करून, भारतीय संविधान ची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी सर्व लहान पक्ष यांनी व भारतीय समाजाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सहभागी होऊन एक सक्षम विरोधी पक्ष निर्माण झाला पाहिजे यासाठी समस्त समस्त भारतीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सहभागी व्हावे….असे आवाहन करणारे खुल पत्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहलेले आहे. आणि ह्या पत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशात लोकशाही कशी टिकून राहील या बाबतीत 7 लोकशाही यशस्वी च्या पूर्व अटी दिल्या आहेत. त्याबाबत ची आपल्या सर्वांना व्हावी या उद्देशाने समता सैनिक दल च्या वतीने 500 खुले पत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रम मध्ये उद्योजक संजय इंगळे, महानगर अध्यक्ष मिलींद शिरसाठ, सुखदेव सपकाळे ,जिल्हा संघटक सचिन शिरसाठ, भिल संघटना चे अरुण मोरे, संजय अहिरे, राजू सपकाळे, राजू भालेराव , आनंद सोनवणे