Saturday, August 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आकांक्षित मागास जिल्ह्यांची श्रेणी सुधारल्याबद्दल राज्यपालांची जिल्ह्यांना कौतुकाची थाप-वर्ग तीनची रिक्त पदे भरण्याच्या सूचना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
आकांक्षित मागास जिल्ह्यांची श्रेणी सुधारल्याबद्दल राज्यपालांची जिल्ह्यांना कौतुकाची थाप-वर्ग तीनची रिक्त पदे भरण्याच्या सूचना

मुंबई, दि. ८ : राज्यातील गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद व वाशिम या चार आकांक्षित जिल्ह्यांनी २०१८ च्या तुलनेत मानव निर्देशांकात प्रगती करून आपले एकूण श्रेणी (रॅंकींग) सुधारल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समाधान व्यक्त करताना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कौतुकाची थाप दिली.

विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेताना राज्यपालांनी सर्व आकांक्षित जिल्ह्यांना वर्ग तीनची पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. वर्ग तीनची पदे रिक्त राहिली तर त्याचा विविध सेवांवर, विशेषतः आरोग्यसेवा क्षेत्रावर विपरित परिणाम होतो असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करावे, आपणही त्यात लक्ष घालू असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी राज्यपालांनी मंगळवारी (दि.८) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून जिल्ह्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या प्रगतीचा अहवाल राष्ट्रपती महोदयांना नियमितपणे सादर करावा लागतो. याकरिता राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांची प्रगती जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंसाधन, आर्थिक समावेशन व कौशल्य विकास तसेच पायाभूत सुविधा या निर्देशांकांवर आकांक्षित जिल्ह्याने काय प्रगती केली याची विस्तृत माहिती राज्यपालांनी यावेळी घेतली.

नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुखराजन यांनी यावेळी विविध क्षेत्रातील जिल्ह्यांच्या प्रगतीची माहिती दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची शान वाढवीत आहे ऐतिहासिक बॉयलर मशीन !अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या नेतृत्वाखाली काम पूर्ण

Next Post

कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करणार – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post
कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करणार – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करणार - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

बांधकाम कामगार मंडळ माहिती अधिकार कक्षेतच;राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

बांधकाम कामगार मंडळ माहिती अधिकार कक्षेतच;राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

चिवास महिला मंडळाचे कण्वाश्रमात वृक्षारोपण 

चिवास महिला मंडळाचे कण्वाश्रमात वृक्षारोपण 

प. वि. पाटील विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

प. वि. पाटील विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम;बालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांचा संयुक्त उपक्रम

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम;बालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांचा संयुक्त उपक्रम

ॲड. प्रविण रंधे ३६८ मतांनी सदस्यपदी विजयी;जळगाव जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत यश

ॲड. प्रविण रंधे ३६८ मतांनी सदस्यपदी विजयी;जळगाव जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत यश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications