<
दिनांक -7 डिसेंबर. 2020
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर , यांच्या -64 – महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.संजय मोरे आणि परिवार यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सकाळी भुसावळ येथील , डॉ. बाबा साहेब आंबेडकर ,यांच्या पुतळयाला परिवारा सहित पुष्पहार व मेणबती लाऊन अभिवादन केले.सकाळी 10 वाजता. रावेर तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. सुनोदा व मागलवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय ,कार्यक्रम संपन्न झाला. येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानी प्रा.संजय मोरे राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हे होते. तर प्रमुख अतिथी , सरपंच सौ.कविता सपकाळे , पो.पा.निता सपकाळे, मायादेवी पाटील , संतोष चौधरी रवींद्र जामनेरकर, ग्रा. स. दिपक वानखेडे हे होते. प्रथम डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रा.संजय मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. नंतर सरपंच, पो.पा. व प्रमुख पाहुणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि वाल्मीक ऋषी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन केले. प्रा.संजय मोरे यांना नुकताच पुणे येथे कोरोना योद्धा म्हणुन, गौरविण्यात आले त्या बदल सरपंच कविता सपकाळे,नितीन सपकाळे, पो.पा.निता सपकाळे, राजेंद्र सपकाळे, पंढरी भाऊ सपकाळे इत्यादींनी शाल श्रीफळ, व बुके देऊन प्रा.संजय मोरे यांचा सत्कार केला. त्या प्रसंगी प्रा.मोरे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. मागलवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे डॉ. बाबा साहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेला, शिवाजी महाराज, वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेला प्रा.संजय मोरे व प्रमुख पाहुणे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी पप्पु कोळी यांनी प्रा.संजय मोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला . राष्ट्रीय मानव अधिकार , तर्फे सुनोदा, मागलवाडी येथे, अगणवाडी येथील, बालकांना पारले पाकीट खाऊ व पेन वाटप करण्यात आले.त्या प्रसंगी सुनोदा व मागलवाडी येथील, संतोष चौधरी, पंढरी भाऊ सपकाळे, भैय्या पाटील, नितीन सपकाळे, माधुरी सपकाळे, महादेवी पाटील,मनिषाबाई वानखेडे, अशोक बोरसे, रामा बोरसे, संजय तायडे, पप्पु कोळी , मंकर्णा बाई तायडे, रेखा तायडे , मनीषा बाई वानखेडे, अक्षय भालेराव, अनिल गुरचळ, राजेंद्र सपकाळे, भाऊराव पाटील, इंगळे सर, फकिरा गाढे, आकाश वानखेडे, अजय सपकाळे, सुधीर तायडे, सागर सावळे, जीवन वानखेडे, अक्षय वानखेडे, सह अगणंववाडी सेविका, मदतनीस, व लहान बालके उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष सपकाळे यांनी केले तर आभार राजेंद्र सपकाळे यांनी मानले. डॉ.आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण निमित्त दिना निमित्त आदिवासी भागातील 64 कुटुंबांना मोहमाडली तिड्या, जानोरी या आदिवासी पाड्यावर साखर, तुरडाळ, तादुळ, बिस्कीट पाकीट वाटप करण्यात आले.त्या प्रसंगी इस्लाल भिलाला , पवन भिलाला ,राधाबाई भिलाला, अनीताबाई भिलाला,रोहित भिलाला,राजु भिलाला, लाल सिंग पावरा, दिपक पावरा, शिकदर तडवी,सागर भीलाला ईत्यादि आदिवासी बाधव उपस्थित होते.या कार्यक्रमाला प्रा.संजय मोरे, पंढरी कोळी, शिकदर तडवी, रवींद्र जामनेरकर, प्रज्ञारत्न मोरे, विशाल मोरे, प्रा.सुभाष सपकाळे, सचिन सुरवाडे व कार्यकर्ते उपस्थित होते.