<
एरंडोल ; – (प्रतिनिधी ) – आज पहाटेच्या सुमारास किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे . पाटील कुंझरकर यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून प्रचंड खळबळ उडाली आहे. पाटील यांचा मृतदेह हा धरणाच्या गेट जवळून अगदी १०० फुटाच्या जवळ आढळून आला आहे . मंगळवारी सायंकाळी भुसावळ येथे एका कार्यक्रमात गेले असल्याची बोलले जात आहे . एवढेच नव्हे तर, मृतदेहाच्या स्थितीवरून घातपाताची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
किशोर पाटील हे गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. मंगळवारी ते गालापूर येथील शाळेत गेले. त्यानंतर भुसावळ येथे एका कार्यक्रमात हजेरी लावली. घरी परतल्यानंतर पहाटे कुणालाही न सांगता ते घरातून निघाले. दरम्यान, आज पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, किशोर पाटील व त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक आहे. तसेच किशोर पाटील हे संघटनेशी निगडीत होते., कुंझरकर यांच्या अंगातील डाव्या बाजूचा बनियानचा भाग फाटलेला आहे. तसेच त्यांच्या डोक्याला देखील मार लागलेला आहे. एवढेच नव्हे तर घटनास्थळी त्यांची मोटारसायकल देखील नाही.
पाटील यांचा मृतदेह हा एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. यावेळी रुग्णालयात अनेक राजकीय मंडळी सह अनेक शिक्षक उपस्थित होते . परंतु नातेवाईकांची मागणी आहे कि पाटील शवविच्छेदन हे जळगाव येथे वैधकीय महाविध्यालयात झाले पाहिजे . या सर्व घटनेवर एरंडोल पोलीस लक्ष ठेऊन आहे .
या घटनेचा पाठपुरावा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे . कुंझरकर हे नेमके कुणाच्या संपर्कात होते याचा तपास एरंडोल पोलिस स्टेशनचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार देवरे हे करीत आहे .