<
जळगाव :- येथील नॅशनल हायवे क्रमांक सहा इच्छादेवी परिसरातील मील्लत विद्यालय लागत असलेल्या रिलायन्स कंपनीच्या पेट्रोल पंपावर विविध सामाजिक संघटना तर्फे दिल्ली येथील शेतकरी पाठिंबा देण्या साठी आणि शेतकरी विरोधी अंबानी अदाणीच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्र सरकार धिक्कार करण्या साठी तीव्र निदर्शने करण्यात आली कापेरीट को धुट- किसनो की लूट नही चलेगी-नही चलेगी केंद्र सरकार की मजबुरी – अंबानी अदानी और जमखोरी कार्पोरेट हराव- देश बचाव -किसान बचाव,जय जवान -जय किसान शहा मोदी किसान विरोधी शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा इत्यादी जोरदार घोषणा देत केंद्र सरकार चा धिक्कार करून तिर्व निदर्शन करण्यात आली.ज्या अंबाणीच्या अदाणीच्या इशाऱ्यावर आणि शक्ती वर मोदी सरकार बळकट व भक्कम आहे अशा अंबानी अदाणीच्या पेट्रोल पंपा सह सर्व वेवसायावर भारतीय जनतेने बहिष्कार टाकण्याचे आव्हान या प्रसंगी मुकुंद सपकाळे यांनी केले.
या निदर्शने आंदोलनात लोक संघर्ष मोर्चाचे सचिव धांडे,महाराष्ट्र जणक्रांतीचे अद्यक्ष मुकुंद सपकाळे, छावा मराठा युवा महासंघाचे अद्यक्ष अमोल कोल्हे, श्रीकांत मोरे,मणियार बिरादारीचे अद्यक्ष फारूक शेख,सावरकर रिक्षा युनियनचे अद्यक्ष दिलीप सपकाळे,नियजली फौंडेशन फारूक कादरी,एमआयएमचे जिया बागवान,सिद्धार्थ शिरसाठ,योगेश गजरे,कलिंदर तडवी,दामू भारंबे,फाईम पटेल,अभिषक कदम,मनोज अहिरे,अलू शे खाटीक , प्रकाश पवार,पंकज सपकाळे,संदीप निकम,अजय इंगडे,मुक्तार अली जहागीर शेख,राहुल जाधव,इत्यादी सह असंख कार्यकर्ते उपस्थित होते.