Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आरोग्य यंत्रणा सुस्तावल्यामुळे ‘डेंग्यू’ वाढतोय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
आरोग्य यंत्रणा सुस्तावल्यामुळे ‘डेंग्यू’ वाढतोय

शहरात डेंग्यू नियंत्रणासाठी धूर फवारणीची गरज : नगरसेवक विष्णू भंगाळे यांची मागणी

जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले असून काही भागात पाऊस देखील पडला आहे. तसेच शहरात अनेक भागात डेंग्यू, मलेरिया आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जळगाव महापालिकेची आरोग्य यंत्रणा सुस्तावल्यामुळेच शहरात ‘डेंग्यू’ वाढत आहे. त्यासाठी शहरातील उघड्या गटारी, नाले, साठलेला कचरा त्वरित उचलून शहरातील प्रत्येक कॉलनीत धूर फवारणी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक तथा माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी केली आहे.

शहरातील मेहरूण, तांबापुरा, शाहू नजर, वानखेडे हौ.सोसायटी, शनीपेठ, गेंदालाल मिल, शिवाजी नगर, ओंकार नगर, नवीपेठ, समता नगर, हरी विठ्ठल नगर परिसर, पिंप्राळा परिसर, सुप्रीम कॉलनी परिसर, जुने जळगाव, संभाजी नगर, आसोदा रोड, प्रजापत नगर परिसर आदीसह इतर महत्वाच्या ठिकाणी अस्वच्छतेचे मोठे साम्राज्य आहे. कचरा उघड्यावर पडून डेंग्यू, मलेरिया डासांचे प्रमाण मोठे वाढत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अनेक भागांत धूर फवारणी बंदच आहे. तर सत्ताधारी नगरसेवकांनी देखील नागरिकांच्या प्रश्नांकडे पाहणे सोडून दिल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे आरोग्य सभापती कुठलाही आढावा घेत नाही. त्यांनी शहरात धूर फवारणी करणे, शहरात पूर्ण १९ प्रभागात साफसफाईचे नियोजन करणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्य सभापतींच्या सततच्या गंभीर दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णदेखील वाढू शकतात. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देत डेंग्यू, मलेरिया नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी माजी महापौर व नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

विद्यार्थ्यांसाठी धावली “वरणगाव राष्ट्रवादी”- पुस्तकांचे संच भेट देऊन नगरपरिषदेचे बंद ग्रंथालय केले विद्यार्थ्यांसाठी खुले; खा.शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव राष्ट्रवादीचा स्तुप्त उपक्रम

Next Post
विद्यार्थ्यांसाठी धावली “वरणगाव राष्ट्रवादी”- पुस्तकांचे संच भेट देऊन नगरपरिषदेचे बंद ग्रंथालय केले विद्यार्थ्यांसाठी खुले; खा.शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव राष्ट्रवादीचा स्तुप्त उपक्रम

विद्यार्थ्यांसाठी धावली "वरणगाव राष्ट्रवादी"- पुस्तकांचे संच भेट देऊन नगरपरिषदेचे बंद ग्रंथालय केले विद्यार्थ्यांसाठी खुले; खा.शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव राष्ट्रवादीचा स्तुप्त उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo