<
भुसावळ(प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार, दिनानिमित्त राष्ट्रीय मानव अधिकार, महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष प्रा. संजय मोरे (अण्णा) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव येथील सेवानिवृत्त प्राचार्य दलीत मित्र भगवान नन्नवरे हे होते. भगवान नन्नवरे व प्रा. संजय मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा. संजय मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. 1948 साली संयुक्त राष्ट्रांनी मानवी हवकाचा जागतिक जाहीरनामा संमत केला. त्या प्रित्यार्थ हा दिवस मानवी हक्क दिन म्हणुन साजरा केला जातो. 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हवक स्थापना करण्यात आली. समाजातील सर्व घटकांतील सर्व लोकांना मानवी हक्क|ची जाणीव असणे आवश्यक असुन प्रत्येक नागरिकाला हक्क प्रदान करीत असताना प्रत्येकाने कर्तव्याची जाण ठेवणे आवश्यक आहे. प्रशासनातील सर्व घटकांनी समाजातील सर्व घटकांपर्यंत मानवी हक्काचे महत्व पटवून देतानाच कर्तव्याचे ही महत्व सागणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील बरीच लोकं माझ्याकडे न्याय हक्का साठी येतात. तेव्हा त्यांना वाटते आपले काम विनाविलंब व्हावे अशी अपेक्षा असते. तेव्हा मी तत्परतेने न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. राष्ट्रीय अध्यक्ष पी. एल. दत्तु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रगतशील जीवनाचा खरा आधार मुलभूत मानवाधिकार हा आहे. असे प्रा संजय मोरे अण्णा राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रा.सुनील तायडे, प्रा. शुभाष सपकाळे, डॉ.महेंद्र सुरवाडे, डॉ.सपना इंगळे, अँड.जतिन सिगनुरकर, पंढरी कोळी, मायाताई मोरे, सिकंदर तडवी, संजय धनगर, युवराज कोळी, एकजित पाटील, विशाल मोरे इत्यादी उपस्थित होते.