<
रावेर(प्रतिनिधी)- रा.मा. क्र.०४ मस्कावद फाटा (भारतीक बुवा) सुनोदा मांगलवाडी अंदाजीत किंमत ५४ लक्ष रुपये निकृष्ठ व अपूर्ण झाल्याने चौकशीची मागणी राष्ट्रीय मानव अधिकार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रा. संजय मोरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अभिजीत राऊत जिल्हाधिकारी जळगांव तसेच अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे सा.बा.मंडळ जळगाव यांना नुकतेच निवेदन दिले आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र यात डांबराचा वापर कमी प्रमाणात झाला असून अनेक ठिकाणी रस्ता उखडत आहे. यातील तांदलवाडी फाटा ते मांगलवाडी या २ कि.मी. च्या रस्त्याचे कामच करण्यात आलेले नाही. या रस्त्याचीही वाईट दुर्दशा आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाईपलाईन खोदकाम केल्याचे मोठे गड्डे पडलेले आहे. न झालेल्या रस्त्याचा निधीही लाटलेला आहे. रस्त्याच्या कामा दरम्यान सुनोदा गावाजवळ साईडपट्टया तयार करतांना शेतकऱ्यांचे बांध जेसीबीच्या सहाय्याने उकरून तिच काळी माती साईडपट्टया तयार करण्यात वापरण्यात आली असून पंढरीनाथ कोळी गट नं २०० यांच्या शेताचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी प्रांताधिकारी यांचेकडे दि.२७ जुलै रोजी तक्रार केली होती. तरी त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. दि. १९ रोजी झालेल्या अति पावसामुळे या काळी माती उकरलेल्या शेतात पाणी घुसून कपाशी पिकाचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत सा.बा. उपविभागीय अभियंता आय. बी. शेख यांना वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधीत अधिकारी काम सुरू असतांना मुद्दाम कामावर गैरहजर राहिले. संगनमत करुन ठेकेदार आणि अधिकारी यांनी शासनाची दिशाभुल करून रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केला आहे. सबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे नाव काळ्या यादीत टाकावे व चौकशी व्होवी अनथा मांगलवाडी मस्कावद, सूनोदा येथील लोकांना सोबत घेऊन तांदलवाडी फाट्यावर आमरण उपोषण करण्यात येईल अशी प्रा.संजय मोरे अण्णा यांनी सांगितले आहे.