<
रावेर(प्रतिनिधी)- येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे सुनोदा येथील गरीब शेतमजूर अल्प भुधारक शेतकरी, पंढरी एकनाथ कोळी यांचे कपाशी पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्त्याचे काम करीत असताना सूनोदा तालुका रावेर येथील शेतकरी पंढरी एकनाथ कोळी गट नंबर 200 यांच्या शेतातील बाधाची माती जे. सी.पी. च्या साह्याने खोदून ती माती रस्त्याच्या साईट पट्या तयार करताना वापरण्यात आली आहे. वास्तविक साईट पट्या तयार करताना पिवळा मुरूम वापरण्यात येतो. परंतु ठेकेदाराने काळी माती रस्त्याच्या बाजूला वापरली आहे. या बाबत सावदा सार्वजानिक बाधकाम विभागाला वारंवार सांगुन सुद्धा सबंधित अधिकारी यांनी दुर्लक्ष केले. अखेर 24जुलै रोजी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले. तरी पण सा.बा.विभाग यांनी लक्ष दिले नाही. अखेर 19 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे माझे उभ्या कपाशीच्या शेतात पाणी शिरल्या मुळे माझे कपाशी पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा हेच जबाबदार आहेत. बांधकाम विभागा मार्फत मार्च महिन्यात मस्कावद फाटा (भारतिक बुवा) ते मागलवाडी गावापर्यंत अदाजे 54 लक्ष रुपयाचे काम सुनील पाटील नामक ठेकेदाराने घेतले होते. परंतु संपुर्ण काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. जागोजागी भररस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असुन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा उपविभागीय अधिकारी, आ.बी.शेख आणि ठेकेदार संगनमत करून काम करतांना डाबराचा वापर कमी केला असुन काम सुरू असताना कोणीही अधिकारी कामावर हजर न होते. यांनी मुद्दाम कामा कडे दुर्लक्ष केले. माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मला न्याय न मिळाल्यास मी आत्म दहन करीन व त्याची पुर्ण जबाबदारी ही सा.बा.विभाग सावदा हेच जबाबदार राहतील, अशी तक्रार जिल्हाधिकारी जळगाव अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आणि अधीक्षक अभियंता प्रश्नांत सोनवणे सा.बा.मंडळ जळगाव यांच्या कडे निवेदन द्ववारे केली आहे.