<
जळगांव(प्रतिनिधी)- आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वार्षिक १२ वा पुरस्कार वितरण कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. अडावद ता. चोपडा येथील ही संस्था असून प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो. जळगांव येथील पत्रकार भवन येथे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात मुफ्ती अरशद अली यांनी कुराण पठण करून केली, कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करीम सालार, हकीम चौधरी, डॉ धर्मेंद्र पाटील, जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल मजीद जकरिया, हे होते. कार्यमाच्या सुरुवातीला शिवश्री लक्ष्मण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
यांना मिळाला महाराष्ट्र गौरव पुरस्कारडॉ.धर्मेंद्र पाटील देश सेवा, शेख फारूक शेख अब्दुल्ला समाज सेवा, डॉ.दिनेश देवरे शिक्षण सेवा, डॉ.हर्षल खर्चे सामाजिक कार्य, पाकिजा उस्मान पटेल महाराष्ट्र रत्न, मुफ्ती अरशद अली खिदमत ए खल्क, किरण भगवान कायंदे उत्कृष्ट समाजसेवक, दशरथ दौलत पाटील निसर्गमित्र, नरेंद्र बाविस्कर शिक्षणसेवा, सुनील न्हानू दाभाडे शिक्षणसेवा, जीतेंद्र के.पाटील उत्कृष्ट समाजसेवक, सदानंद डी. भावसार शिक्षक जीवन गौरव, चंद्रकांत एस. कोळी शिक्षण सेवा, संजय बाविस्कर उत्कृष्ट समाजसेवक, शिवाजी गायकवड क्रीड़ा, शकीला खातून सईद अहमद खान, रियाज शेख, सुनीता ठाकरे,यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यांना देण्यात आला खान्देश भुषण पुरस्कार
शेख ऐनोद्दीन सय्यद हसन शिक्षण सेवा, सैय्यद अस्लम मण्यार शिक्षणसेवा, दारूल कजा फौंडेशन लोकसेवा अजीम खान शिक्षक गौरव, पटेल बबिता उस्मान शिक्षणसेवा, पाटील सुकलाल अरुण समाजसेवा, नजीर अहमद खान मरणोपरांत उत्कृष्ट कवी, मजीद करीम मण्यार शिक्षण सेवा, शेख सादिक शेख इमाम क्रीडा खेळ, समीर विष्णु घोडेस्वार शिक्षण सेवा या मान्यवरांना खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
न्युज एनी टाईम पोर्टलच्या प्रतिनिधींना देण्यात आला पुरस्कारकोरोना काळात न्युज एनी टाईम पोर्टल व युट्युब चॅनलच्या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या प्रतिनिधींना सुध्दा बेस्ट रिपोर्टर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्यात प्रामुख्याने रोशन शाह नशिराबाद, नजीर शेख चिनावल, गणेश कोळी उतराण, अमीन शाह कजगाव, आसिफ शाह यावल, गफ्फार शाह चाळीसगाव, शहबाज देशपांडे पाळधी, सलमान शाह धुळे, अकील शाह धुळे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावल येथील शिक्षक जावेद शेख यांचा विशेष सत्कारशिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे तसेच तालुक्यापासून ते थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणारे यावल येथिल शिक्षक जावेद शेख यांना संस्थे मार्फत “मल्टी स्किल पर्सन” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
फारूक शाह नौमानी यांचा सत्कारसलग१२ वर्षे अथक परिश्रम करून विविध क्षेत्रातील मान्यवरांना संस्थेमार्फत पुरस्कार देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणारे फारूक शाह नौमानी यांना सुद्धा या ठिकाणी सत्कार करुन गौरविण्यात आले. कार्यक्रमामधे उपशिक्षणाधिकारी विजय पवार, सरकारी वकील श्री कलंतरी, अ.मजीद जकरिया, अब्दुल करीम सालार, हकीम आर चौधरी, पं.स. उपसभापती अमिना तडवी, इम्रान शेख, फारूक शेख, नुरुद्दीन मुल्लाजी, प्रतीक सोनार, शरीफ शेख, लक्ष्मण पाटील, भूषण पाटील, शेख अब्दुल कादिर, अश्फाक शाह, रूबाब तडवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थाध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन जावेद शेख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अय्युब शेख, रोशन शाह, आसिफ शाह, अल्ताफ शेख, जुबेर शाह, अबुल मुजफ्फर यांनी सहकार्य केले.