<
जामनेर प्रतिनिधी/अभिमान झाल्टे
जामनेर तालुक्यातील पहूर येथील विद्यमान शिवसेना विभाग प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे यांची जामनेर विधानसभा शिवसेना प्रवक्ते पदी निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, राज्यसभा खासदार दैनिक सामना संपादक संजय राऊत साहेब, जिल्हा संपर्क नेते विलासजी पारकर यांच्या आदेशाने जामनेर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी जाहीर करण्यात आले. यामध्ये पहूर येथील गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेची कमान सांभाळणारे निष्ठावंत शिवसैनिक तथा शिवसेना विभाग प्रमुख व दैनिक सामना’चे तालुका प्रतिनिधी गणेश पांढरे यांची शिवसेना तालुका प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे. त्यांचे अभिनंदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील, सुकलाल शेट बारी, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील, अॅडव्होकेट भरत पवार आदी पदाधिकार्यांनी पत्रकार गणेश पांढरे यांचे अभिनंदन केले.