<
जळगांव(प्रतिनिधी)जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात एम.कॉम चे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लिविंग सर्टिफिकेट (L.C)काढण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीच्या नावाखाली मनमानी पैशाची मागणी होत असल्याने विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु )या संघटनेच्या विभाग प्रमुख अँड. अभिजित रंधे यांच्याशी संपर्क साधून विनंती अर्ज दिला.महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे विभाग प्रमुख अँड. अभिजित रंधे यांनी जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाच्या संबंधित प्राचार्य यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या अडचणी कायद्यांतर्गत व सनदशीर मार्गाने मांडून व महाविद्यालयाच्या प्रशासनाला समक्ष भेटून विद्यार्थ्याची होणारी अडचण व जास्त प्रमाणात होणारी आर्थिक मागणी लक्षात आणून दिली. व योग्य ती फी भरण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु )या संघटनेच्या विभाग प्रमुख अँड. अभिजित रंधे यांच्या प्रयत्नांनी विद्यार्थ्यांचे हजारो रुपये वाचवले.ही संघटना अराजकीय असून सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) संघटनेच्या पदाधिकारी, सदस्य यांना लक्षात आणून द्यावे असे या संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले उत्तर महाराष्ट्र प्रदेश कंमिटी चे सचिव दीपक सपकाळे ,जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन, भावेश ढाके हे उपस्थित होते.