<
जामनेर/प्रतिनिधी -अभिमान झाल्टे जामनेर तालुक्यात शिवसैनिक जोमात कामाला लागलेले दिसत असुन.राजकीय पटावर रोज नवनवीन कार्यक्रमाच्या माध्यमातुन जामनेरकरांचे लक्ष वेधत आहे. ग्रामपंचायत निवडणूका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष आपली मोट बांधतांना दिसत असतांना शिवसेनेने निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भवन मुंबई येथून दैनिक सामनाच्या माध्यमातून आपली नविन कार्यकारणी प्रकाशित करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदाचे असलेले महत्त्व,संघटनात्मक कामे आणि ग्रा.पं. निवडणुकी संदर्भात यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांच्या निवासस्थानी बैठक 15 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजगड निवास्थानी बोलाविण्यात आली होती.
बैठकीत मध्ये जामनेर तालुक्यातील सुरु असलेल्या ग्रा.पं. निवडणूकां संदर्भात मुख्य चर्चा झाली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर ग्रामपंचायत निवडणुक असलेल्या सर्व गावांची जबाबदारी वटुन नेमणूका करण्यात आल्या. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना आव्हान केले की निवडणूक रिंगणात सावध राहुन जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेना भगवा फडकवा.येणारा काळ हा शिवसेनेचाच आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नेरी येथील अर्जुन जाधव, विशाल कुमावत, विजय चौधरी,प्रशांत धनगर, हिंगणे येथील पवन राठोड, प्रमोद राठोड, कार्तिक चव्हाण, मनोज राठोड, विलास राठोड, विश्वास राठोड, अंकुश राठोड, पळासखेडा काकर येथील श्रावण राठोड यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला
बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ.मनोहर पाटील तर प्रमुख अतिथी उपजिल्हा संघटक सांडु गुरव,युवासेना उपजिल्हा अधिकारी विश्वजीतराजे पाटील,तालुका अधिकारी विशाल लामखेडे,विधानसभा क्षेत्र संघटक रमेश लिंगाईत,शहर प्रमुख अतुल सोनवणे,ज्ञानेश्वर जंजाळ,विलास पाटील,सुकलाल बारी हे होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे आणि आभार विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील यांनी मानले.