<
जळगाव, दि.२१ – राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधी ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे संत गाडगेबाबा उद्यानात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
केंद्र शासनाने महात्मा गांधी ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले असून केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हाभर अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत गाडगे महाराज यांच्या ६४ व्या पुण्यतिथीनिमित्त नेहरू युवा केंद्रातर्फे जळगाव शहरातील संत गाडगेबाबा उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक चेतन वाणी, आकाश धनगर, संजय बाविस्कर, रितेश चौधरी, सचिन बोरसे, विलास पाटील, निखिल सोनी आदींनी परिश्रम घेतले.
संत गाडगे बाबा पुण्यतिथीनिमित्त सर्वांनी गाडगे बाबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. संत गाडगेबाबा यांनी सर्वांना दिलेली स्वच्छतेची शिकवण प्रत्येकापर्यंत पोहचविण्याची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.