<
जळगांव(प्रतिनिधी) रायसोनी इंजिनिअरिंग व मॅनेजमेन्ट कॉलेज जळगाव या महाविद्यालयात एमबीए शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानक झालेल्या ऑटोनोमस मुळे फी वाढ झाल्याने विद्यार्थ्यांची धडपड होत आहे. कोरोना संकटात सर्व सामान्य नागरिकांचे व्यवसाय व नोकरीची खूपच बिकट परिस्थिती असतांना अचानक झालेल्या फी वाढ मुळे विद्यार्थ्यांचा कुटुंबाचे खूपच हाल होत आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर देशावर आर्थिक संकट असतांना आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून आटोनोमसच्या आदेशाने फी वसूल करणे हे कितपत योग्य वाटत आहे? अश्या कोरोना संकटकाळात व आर्थिकदृष्ट्या कोलमडले असतांना या परिस्थितीमध्ये आटोनोमसचे आदेश काढू नये व जुनी फी वर विद्यार्थ्यांचे या वर्षाचे व मागील वर्षाचे शिक्षण पूर्ण व्हावे. असे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) चे विभागीय प्रमुख अँड. अभिजित रंधे यांनी प्राचर्या प्रीती अग्रवाल, प्रा.रफिक शेख मा. रायसोनी सर इंजिनिअरिंग व संचालक मंडळ कॉलेज यांना निवेदन दिले आहे. या विषयावर संचालक मंडळ चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येईल अस आश्वासन प्रितम रायसोनी यांनी दिले त्याबद्दल मासू कडून महाविद्यालय प्रशासनाचे आभार मानण्यात आले. महाराष्ट्र स्टुडंटस युनियन संघटना अराजकीय असून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव कार्यशील असणार आहे असे विभाग प्रमुख अँड.अभिजित रंधे यांनी सांगितले. या वेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे दिपक सपकाळे, चेतन चौधरी आदी उपस्थित होते.