<
जामनेर/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे
सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार जामनेर येथील रुपेश राजाराम बिऱ्हाडे यांना जाहीर झाला असून.
या पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे ६ जानेवारी २०२१ ला होणार आहे. या वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,हिरवेबाजार येथील आदर्श सरपंच पोपटराव पवार,समाजप्रबोधन हभप निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) आदी उपस्थित राहणार आहे. अशी माहिती सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील यांनी दिली.