<
जळगाव : येथील माहेश्वरी युवा संघटनची पहिली बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ऍड.बबनभाऊ बाहेती स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा नियोजन करण्यात आले. तसेच, आगामी उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनचे अध्यक्ष मधुर झंवर उपस्थित होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरात मास्क वाटप आणि नागरिकांची स्क्रीनिंग करून तपासणी केली जाणार आहे. कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे शहरात गर्दीच्या अनेक ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. तसेच जनजागृती करण्यात येणार आहे.
शहरात ३० ते ३ जानेवारी दरम्यान सागर पार्क येथे माहेश्वरी युवा संघटनच्या पुढाकाराने ऍड. बबनभाऊ बाहेती स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा दिवसरात्र खेळवली जाणार आहे. स्पर्धेचे हे १६ वे वर्ष आहे. स्पर्धेत २० संघ अंतिम झाले असून त्याचे नियोजन करून जबाबदारी वाटप करण्यात आली. यावेळी ३० डिसेंबर रोजी स्पर्धेचे उद्घाटन होऊन पहिला सामना खेळला जाणार आहे. कोरोना नियंत्रणासाठीचे सर्व नियम पाळून स्पर्धा खेळली जाणार आहे.
बैठकीत सचिव अक्षय बिर्ला, प्रोजेक्ट चेअरमन संकेत जाखेटे, कार्याध्यक्ष अभिलाष राठी, अभिषेक झंवर, राहुल लढढा, प्रवीण सोनी, आदित्य बेहेडे, संतोष समदानी यांच्यासह माहेश्वरी युवा संघटनचे सदस्य उपस्थित होते.