<
जळगाव – (प्रतिनिधी) – २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामूहिकपणे मनुस्मृतीचे दहन केले. त्यानंतर भारतातील सर्व स्त्रियांना आणि बहुजनांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून ओळखला जातो. उद्या 25 डिसेंबर स्त्री मुक्ती दिवस असल्याने या अनुषंगाने स्त्री मुक्ती दिनानिमित्त उद्या पिंप्राळा हुडको येथील नागवंशी बुद्धीविहारात वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुजाता ठाकुर महिला जिलाध्यक्ष फिरोजा शेख जिला महासचिव कविता सपकाळे महिला महानगर अध्यक्ष संगीता मोरे महिला उपाध्यक्ष पंचशिला आराक युवक महानगर अध्यक्ष जितेंद्र केदार, जिल्हा उपाध्यक्ष डिंगबर सोनवणे गंमीर शेख जिला महासचिव , गणेश माहाले महानगर अध्यक्ष यांनी केले आहे.