<
पाचोरा – कोरोना प्रादुर्भाव वाढू नये या करीता सर्वत्र लॉक डाऊन नागरीकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आले होते.या काळात पोलीस कर्मचाऱ्यांन सोबत बंदोबस्तासाठी माजी सैनिकांच्या हि समावेश होता याच बरोबर पत्रकारांनी ही कोरोना काळात उत्कृष्ट पध्दतीने कार्य केले आहे. म्हणून या कार्याची दखल घेत पाचोरा पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे,व पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी दिनांक १३/०१/२०२१ बुधवार रोजी बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनास मदत करण्याऱ्या ५० माजी सैनिकांना कोरोना योध्दा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या सह शिक्षेका सुवर्णा महाजन यांनी कोरोणा काळात आपल्या रांगोळी मार्फत कोरोना जनजागृती केलेल्या बद्दल त्यांचा हि कोरोना योध्दा सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात निर्भिडपणे पत्रकारीता क्षेत्रात काम करणारे पत्रकार,
प्रा.सि एन चौधरी सर,अनिल आबा येवले, किशोर रायसाकडा ,संदिप महाजन ,जावीद शेख,शामकांत सराफ, निलेश पाटील,प्रमोद सोनवणे, गणेश शिंदे,विनायक डिवटे , नंदू शेलकर, शांताराम चौधरी, योगेश पाटील,अमोल झेरवाल,विजय पाटील,प्रविण ब्राम्हणे,संजय पाटील सह अन्य पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून यावेळी सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.बी एन पाटील होते.सौ.सुर्वणा महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.साहाय्यक पोलीस निरीक्षक, विकास पाटील यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमास उपस्थिती API राहूल मोरे,गणेश चौबे,सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सि एन चौधरी यांनी केलेे.