<
जामनेर(प्रतिनीधी)- कोरोना लसीकरणा बाबत प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात किंवा कोविन अँप वर काही अडचणी आहेत का? तसेच १००% लसीकरणाचे कामकाज होण्यास काय अडचणी आहे याची त्यांनी माहिती घेतली तसेच १००% लसीकरणाचे कामकाज होईल असे नियोजन करण्याचे सांगितले. “अलो बेनिफिशरी ” हा पर्याय निवळुन ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केली आहे म्हणजेच जे सिस्टीम मध्ये अपडेट आहेत अशा फ्रंट लाईन वर्कर यांना लस देऊ शकतो त्यांना कोविन अँप वर संदेश येणे आवश्यक नाही. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच कोरोना रुग्णाची संख्या जिल्ह्यात वाढत असल्यामुळे प्रत्येक तालुक्यातुन २०० आर टी पी सी आर नमुने संकलित झाले पाहिजे व खाजगी डॉक्टर यांच्याकडील बाह्यरुग्ण विभागात किंवा अँडमिट सारी, आय एल आय, नुमोनिया इ.रूग्णांची विषत्वाने चाचणी होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. सदर प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.के.पाटील, डॉ. आशिष वाघ हे उपस्थित होते.