<
जळगाव -(प्रतिनिधी)-येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगांव येथील बी. एस. डब्ल्यु. तृतीय व एम. एस. डब्ल्यु द्वितीय वर्गातील विद्यार्थी क्षेत्रकार्या करीता जळगांव तालुका पंचायत समिती अंर्तगत मोहाडी ग्रामपंचायत येथे सप्ताहतील बुधवार व गुरुवार रोजी क्षेत्रकार्यातंर्गत समुदाय संघटन या आभ्यास पद्धतीचा प्रत्यक्ष अध्ययन करतात.१५ ऑगस्ट संपुर्ण भारत भर स्वतंत्रता दिवस साजरा होतो. या अनुषंगाने मोहाडी गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना समवेत प्रभात फेरीचे (पुर्व नियोजीत) आयोजन केले होते.भारत माता की जय असे घोषणा देऊन प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली. स्वच्छ भारत सुंदर भारत, माझे गांव स्वच्छ गांव , मुलगी वाचवा मुलगी शिकवा , झाडे लावा झाडे जगवा , अश्या घोषणा देवुन प्रभात फेरी मोहाडी ग्रामपंचायत येथे दाखल झाली तेथे सरपंच मा. शोभाताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सुगम्य भारत सशक्त भारत या विषयावर जनजागृती पर पथनाट्य सादर केले या पथनाट्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. गणेश बागुल सर तसेच ग्रामसेवक दिलीप पाटे यांनी देखील पथनाट्याचे कौतुक केले. आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा पाऊस पाडत आम्हास उपकृत केले. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वी करण्यासाठी एम. एस. डब्ल्यु चे क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी मयुरेश निंबाळकर, योगेश वाडेकर, बुद्ध भूषण मोरे, निशिकांत बिंबे, हर्षल दुसाने , रितेश चौधरी, शुभांगी ब्राम्हणे, बी. एस. डब्ल्यु चे क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी दीपाली चव्हाण, किरण जाधव, मनोज गावित, राजेंद्र बरेला, मानसी जावळे, तेजस्विनी राणे, योगीता गांगुर्डे, गुणवंत पाटील, वैशाली पाटील इ. परिश्रम घेतले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी क्षेत्रकार्य समन्वयक प्रा, डॉ. शाम सोनवणे, मार्गदर्शक प्रा. निलेश चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ यशवंत महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.