<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलीत लोकसेवक मधूकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगांव येथील बी. एस. डब्लु. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी क्षेत्रकार्यातंर्गत समाजकार्याच्या अभ्यास पद्धती, व्यक्तीसाह्य कार्य व गटकार्य हे प्रत्यक्ष अभ्यासकरीता नशिराबाद येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा क्र. १ (मुलांची) आणि केंद्र क्र. २ (मुलींची) येथे सप्ताहतील प्रत्येक बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवशी क्षेत्रकार्य करीत असतात.आज १५ ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन स्वातंत्रता दिवस चिरायु होवो क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थींनी गावामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रभात फेरीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी सुरु असतानां ग्रामस्थ बांधवानां स्वछता पाळा रोगराई टाळा, मुलगी वाचावा मुलगी शिकवा या घोषणानीं उद् बोधन केले. त्याच बरोबर गावाच्या मध्यवर्ती चौकात पोस्टर प्रदर्शनाद्वारे जनजागृती केली.अशा प्रकारचे संदेश व पोस्टर प्रदर्शन करुन स्वतंत्रता दिन साजरा केला हा कार्यक्रम क्षेत्रकार्ये पर्यवेक्षक प्रा. निलेश चौधरी, डॉ. नितीन बडगुजर यांच्या संकल्पनेतुन निर्मित झाला. या कार्यक्रच्या यशस्वी आयोजन करीता क्षेत्रकार्य प्रशिक्षणार्थी चौधरी कमलेश, गावित हिरामण, गावित गणेश, पटोले काजल, पाटील रोशनी, योगेश पाटील, गजानन मानकर , युनूस पटेल , संदेश पाटील यांनी परिश्रम घेतले त्या करीता समन्वय व मार्गदर्शन प्राथमिक शाळेमधील मुख्याध्यापिका सौ.जया देशमुख, आणि केंद्र क्र.२ च्या मुख्याध्यापिका सौ. नेमाडे आणि सर्व शिक्षक , केंद्रप्रमुख मा. तिडके सर यांचे सहकार्य लाभले. या स्तुत्य उपक्रमाकरीता क्षेत्रकार्य समन्वयक डॉ. प्रशांत भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय जी महाजन यांचे शुभेच्छापर मार्गदर्शन लाभले.