<
जळगांव(प्रतिनीधी)- पुर्णा तहसील कार्यालय जि.परभणी येथे निवडणूकीसाठी काम करणाऱ्या शाखा अभियंता पांडुरंग सखाराम मोरे यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी, हल्लेखोरांवर खूनाचा गुन्हा दाखल करावा, मोरे कुटुंबाला शासकीय मदत मिळावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांना बानाई संघटनेच्या सभासदांनी निवेदन दिले. डाॅ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स या जिल्हा शाखेच्या सभासदांनी दिलेले निवेदन तहसीलदार श्री पंकज लोखंडे यांनी स्विकारले. या प्रसंगी बानाई चे आर जे सुरवाडे, मनोहर तायडे, सुशांत मेढे, ब्रम्हानंद तायडे, यु पी ठाकुर, किरण तायडे, ममता सपकाळे, अबोली तायडे, अजय निकम, भालेराव, लोखंडे, गुरुचल कांबळे, सोनवणे, अहिरराव आदी अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियंता मोरे हे निवडणूक निर्णय अधिकारी आलेगाव, कळमुला, चांगेफळ कार्यरत असताना २३ डिसेंबर ते ४जानेवारी पर्यंत ची कामे त्यांनी चोख केली. ४ जानेवारीला माघारी घ्या दिवशी काही उमेदवारांशी वाद झाला. तहसीलदार पूर्णा यांनी बघ्याची भुमिका घेतली म्हणून तणावातून मोरे तहसीलमधून बाहेर पडले. ५ जानेवारीला त्यांचा मृतदेह पूर्णा नदीच्या पूलाखाली रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याने मोरे निवडणुकीचा बळी ठरले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी,खूनाचे कलम लावावे, मोरे कुटुंबाला योग्य ती आर्थिक शासकीय मदत मिळावी निवडणूक अधिकारी यांना संरक्षण मिळावे अशा प्रमुख मागण्या बानाई सभासदांनी केल्या. यावेळी प्रशासनातर्फे त्वरीत कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन मिळाले.