<
जळगाव(प्रतिनीधी)- चंदु आण्णा नगर जवळील पोलिस काॅलनीत पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्ध वंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव येथील प्रसिद्ध कवी ईश्वर वाघ हे उपस्थित होते. सुरूवातीला प्रा.भीमराव सपकाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. नारे दादा व एम आर बाविस्कर सरांनी पाहुण्याचे स्वागत केले. डाॅ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रम सुरू झाला. या वेळी बोलताना वाघ सरांनी बुद्ध यांच्या तसस्येच्या विविध अवस्था व ज्ञानप्राप्ती त्या वेळी झालेली सुजाता ची भेट होऊन बुद्धांनी खीर प्राशन केली यासाठी प्रत्येक पौर्णिमेला खीरदान करावे असे विचार व्यक्त केले. किरण इंगळे, अॅड. अनिल इंगळे यांनी ही आपले विचार मांडले. प्रा.भीमराव सपकाळे यांनी सर्वांना बुद्धवंदना दिली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोजराज गायकवाड, दिपक तायडे, लकी तायडे, विनोद कांबळे, रविंद्र जंजाळे, अमोल वाघमारे, सीताबाई तायडे, अलका तायडे, भरत सोयंके आदींनी परिश्रम घेतले. आर जे सुरवाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.