<
नांद्रा,ता.पाचोरा(प्रतीनिधी)-गिरणा परिसर समाज माध्यम समूहाच्या वतीने गिरणा परिसर समूहाचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून व पिटीसीचे चेअरमन संजयनाना वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनासह विविध क्षेत्रातील अनुभवींच्या उपस्थितीत श्री क्षेत्र पद्ममालय येथे गिरणा परिसर समाज माध्यम समूहाचा “”उत्सव स्वातंत्र्याचा”” हा दुसरा स्नेह मेळावा सालाबादप्रमाणे स्वातंत्रदिनी संपन्न झाला.
खऱ्या अर्थाने आपण आज समाज माध्यमांच्या भाऊगर्दीत वाहत चाललो आहोत असं सर्रास म्हटलं जातं परंतु याला गिरणा परिसर समाज माध्यम समूहाने जपलेल्या वेगळेपणाने हा समूह अपवाद ठरत आहे.या समूहाने सृजनशील विचारांचा आयाम निर्माण करन प्रचलित चॅटींग वगैरेच्या पलीकडे जाऊन गिरणा परिसरातील तमाम समाज घटकांच्या कृषी,पर्यावरण,आरोग्य,शिक्षण अर्थातच सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक,सांस्कृतिक,आर्थिक,राजकीय विचारांची देवाण – घेवाण होऊन या क्षेत्रात सृजनशील बदल घडावा या उदात्तवादी हेतूने अभिनव संकल्पनेतून सर्व समूहातील उपर निर्दिष्ट क्षेत्रातील सहभागी घटकांनी “”सर्वांसाठी एक व एकासाठी सर्व”” या समर्पित भावनेतून एक विचारांचा अव्याहत जागर करण्याचा आयाम तयार करून संघटन केले आहे. यासाठी कोणीही स्वार्थी भाव न ठेवता गिरणा परिसरात समाज माध्यमाचा आधार घेत सर्वांसाठी “”गिरणा परिसर””समूहाच्या माद्यमातून हक्काचं व्यासपीठ उभं केलं आहे. यासाठी समूह समावेशकांसोबतच सर्व सहभागिंची नेहमीच सकारात्मक साथ मिळत आहे व त्यातुन वैचारिक सहविचारी सहभागी मंडळींचं मोलाचं मार्गदर्शन व विचारांची देवाण घेवाण होऊन सामाजोत्थानाच चांगलं मंथन घडत आहे.
समाजातील दुर्बल घटक बालके, महिला ,युवक, युवती,शेतकरी,अनुसूचित जाती जमाती यांच्या विविध प्रकारच्या सामाजीक प्रश्नांवर वेळीच प्रकाश टाकत त्यास वाचा फोडण्याचे काम व त्यासाठी वेळीच विधायक कार्यक्रम कसा देता येईल यासाठी हा समूह नेहमीच प्रयत्नशील असतो.आजचा “”उत्सव स्वातंंत्र्याचा”” हा स्नेह मेळावा त्याचाच एक भाग होता. वर्षभरातील समूहातील कामकाजावर मंथन ,अडीअडचणी यावर चर्चा घडवून आणून जेष्ठ मार्गदर्शकांच्या विचारधारेतून भूतकातील अनुभव,वर्तमान काळातील वास्तव व भविष्य काळाचा वेध यांतून सुवर्णमध्य काढत जुन्यांचा बोध व नव्यांचा शोध या युक्तीने सामाजीक बांधिलकीचा वेगळा आयाम कसा प्रस्थापित होईल यासाठी गिरणा परिसर समूह प्रचंड आशावादी आहे व त्यासाठी या स्नेह मेळाव्याचा नक्कीच हातभार लागेल हे मात्र निश्चित.कार्यक्रमास पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ,जि.प.सदस्य पदमसिंग पाटील,पाचोरा पंचायत समितीचे सभापती बंन्शिलाल पाटील,एरंडोल पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन,माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शालिग्राम मालकर,पाचोरा नगरपालिकेचे नगरसेवक विकास पाटील,भुसावळ रेल कामकार सेनेचे ललित मुथा,पाचोरा विघ्नहर्ता मल्टिपेशालिटी चे डाँ.भाषन मगर,मनसेचे नरेश पाटील ,एन,यु,जे,अयाज मोहसिम,इंडीया आप तक चे धर्मद्र राजपुत,पि.बि.सी.चे.नगराज पाटील यांच्या सह असंख्य जेष्ठ श्रेष्ठ ग्रुपचे सदस्य उपस्थितीत होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र पाटील,गजानन पवार,राजेंद्र साळुंखे,सुरेश कोळी,शिवाजी तावडे,मनोज वाघ,हिरालाल सुर्यवंशी ,सुशील सुर्यवंशी ,संदीप लोहार,निलेश बडगुजर यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन भैय्या नरेंद्र पाटील,प्रास्तविक महेंद्र पाटील व अँडमिन तथा पत्रकार राजेंद्र पाटील,आभार योगेश सुर्यवंशी यांनी मानले.