<
जामनेर/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे आमखेड़ा सावरला गृप ग्रामपंचायतीत
सरपंचपदी लिलाबाई भिल यांची निवड करण्यात आली आहे.
तर उपसरपंच पदी संतोष तायडे यांची निवड करण्यात आली.
सौ लिलाबाई दशरथ भिल 417 पैंकी 319 मतांनी विजयी होऊन दोन वर्ष कालावाधी साठी नव्याने सरपंच पदी निवड करण्यात आली आहे. तर प्रकाश दशरथ भिल(सदस्य) यांना 417 पैकी 317, व संतोष तायडे(उप सरपंच पदी), निवड झालेली असून अरुणाबाई गणेश पाटील यांना 417 पैकी 283,मतांनी विजयी होऊन त्यांची निवड करण्यात आली आहेत. सर्व निवडुन आलेल्या सदस्यांचे ग्रामस्थांनी फुलांच्या हाराने स्वागत केले. सावरला गावात एकाच घरातील भिल समाजात माय-लेक निवडुन आल्याने भिल समाजात जणू कशी दिवाळी साजरी झालेली दिसून येत आहे. गावातील गरीबांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळेल असे शब्द सौ लिलाबाई दशरथ भिल यांनी व्यक्त केले.
आज रोजी अनेक केंद्र सरकारच्या व राज्य सरकार च्या योजना आहेत परंतु खर्या लाभार्थ्यांना मिळत नाही,पाणी पुरवठा व्यवस्थीत केला जात नाही, आरोग्य सुविधा, मागासवर्गीय निधी,अपंग कल्याणकारी निधी योजना,अशा अनेक योजनाचा लाभ गोर गरीबांपर्यंत पोहचविले जातील अशा प्रतिक्रिया विश्वनाथ भाऊ सुरळकर यांनी दिल्या.व स्वत:
सूत्रसंचालन केले आणि
यावेळी नारायण गोपाळ,गणेश बाबुराव पाटील, कल्याणसिंग पाटील,इरफान खान नथ्थेखान,अब्दुल्ला खान,आदि सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.