Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहीमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहीमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ


कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीसाठी
मोबाईल चित्ररथ प्रभावी ठरेल – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत


जळगाव, (जिमाका) दि. 16 – कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीकरणाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावीपणे जनजागृती करेल. कोरोना लस ही सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही, त्यामुळे नागरीकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणाच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, जळगाव यांच्या उपक्रमांतर्गत कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एंरोडल, धरणगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि अमळनेर आदि तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आल, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो अमरावतीचे अंबादास यादव, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, नेहरू युवा केंद्राचे नरेंद्र डांगर, सेवानिवृत्त प्रचार अधिकारी उल्हास कोल्हे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, लसीकरणाबाबत पारंपारिक कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे पारंपारिक कलेच्या माध्यमातून नागरीकांना कोरोना लसीकरणाचे महत्व समजण्यास मदत होणार असून ही कला जोपासणाऱ्या कलाकारांना व त्यांच्या कलागुणांनाही या मोबाईल चित्ररथामुळे वाव मिळणार आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे.
या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे हा या मागील उद्देश आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरीकांन करून देण्यात येणार आहे.
यावेळी दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशिय संस्थेचे विनोद ढगे आणि त्यांच्या कलापथकातील कलाकारांकडून स्थानीक बोली भाषेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी बापू पाटील, किरणकुमार आणि चमु परिश्रम घेत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ऑल इंडिया सीफेअर्स व जनरल वर्कर्स युनियनच्या बहुप्रतिक्षित ध्वजाचे अनावरण

Next Post

कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांकडून आढावा ;नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा;यंत्रणांनी कर्तव्यात ढिलाई दाखवू नये-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांकडून आढावा ;नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा;यंत्रणांनी कर्तव्यात ढिलाई दाखवू नये-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d