<
जळगांव ग्रामीण(चेतन निंबोळकर)- दिनांक १५आँगस्ट गुरूवार रोजी नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदर्श रक्तदाता श्री. मुकुंदजी गोसावी, पाळधीचे प्रसिद्ध उद्योगपती शरदकाकाजी कासट, जेष्ठ शिक्षक आधार गुरुजी, जिवनज्योती व्यसन मुक्तीकेंद्राचे प्रमुख डाँ. बाळासाहेब कुमावत, सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकूर, शाळेचे आश्रयदाते श्री.भगवान शंकर सुर्यवंशी, अध्यक्ष श्री.प्रशांत सुर्यवंशी, शाळेच्या चेअरमन सौ.अर्चना सुर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतीमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपले कलागुण सादर केले. यात देशभक्तीपर गीत, भाषणे, अभिनय आणि नृत्य यातून विद्यार्थ्यांनी भारत मातेला वंदन केले. पालकांसह अतीथीगण ही त्यांचे कलागुण पाहून भारावून गेले होते. कार्यक्रमात पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी त्या जवानांनी दिलेल्या बलिदानावर आधारित नृत्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश करंदीकर व ज्योती राणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांच्यासह उज्वला झंवर, विजया मोरे, राधिका उपाध्याय, सोनल कुंभार, अश्विनी ठाकरे, गुणवंत पवार, सुवर्णा पवार, सतिश पाटील यांनी परिश्रम घेतले.
This school is a big step for rural bright future… Thanks Prashant Sir and Archana Ma’am..????????????????