<
जळगांव(चेतन निंबोळकर)- १५ ऑगस्ट ला संपुर्ण भारतात रक्षाबंधन कार्यक्रम खूप उत्साहाने साजरा झाला.त्याचेच औचित्य साधत जेसीआय जळगाव डायमंड सीटी तर्फे हा कार्यक्रम आपले सामाजिक भान ठेवत अंध,अपंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे विद्यार्थांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेच्या महिला पदाधिकारीनीं राख्या बांधून तसेच फरसाण व मिठाई वाटून एका अनोख्या पध्दतीने पवित्र रक्षाबंधन साजरा करण्यात आला.तेथील विद्यार्थ्यांचा आणि लोकांचा उत्साह,सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास याबद्दल जेसीआय जळगाव डायमंड सिटी चे अध्यक्ष जेसी जिनल जैन यांनी त्यांचे कौतुक व प्रशंसा केली.तसेच जेसीआय डायमंड सिटीच्या पदाधिकार्यांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग घेतला . या कार्यक्रमाची संकल्पना हि जेसीआय जळगाव डायमंड सिटी चे जेसी प्रसाद जगताप व आयपीपी विजय सोनार यांची होती. या कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक जेसी सविताजी सोनार हे होते. या कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी जेसी प्रशांत पारीख, भंडारी, जेसी सुशील अग्रवाल,शुभांगी श्रीमाळ,छाया जांगडा आदींनी परिश्रम घेतले.