<
केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच रथसप्तमी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व शिक्षकांनी या वेळेस आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितली तर सहज आनंद फेगडे , पलक सुजित कासार , कार्तिकी कोल्हे या विद्यार्थ्यांनी यावेळी ऑनलाईन भाषणे केली तसेच या निमित्ताने निबंध स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे सूर्याच्या सकाळच्या उन्हात डी जीवनसत्व असते. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. सूर्य ज्या रथावर स्वार होतो त्याला सात घोडे असतात. सूर्याचा सात घोड्यांचा रथ उत्तरायणात सरकतो. म्हणून रथसप्तमीला सूर्यनमस्कार करण्याचा आपला प्रधान आहे. आजपासून प्रत्येकाने दररोज किमान दहा सूर्यनमस्कार घालावे त्यामुळे आपले आरोग्य सदृढ होईल असे विद्यार्थ्यांना यावेळी सांगण्यात आले. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.