<
जळगाव (प्रतिनिधी) :- सिंगनूर तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी सध्या व्यंकटेश नगर जळगाव येथील प्राध्यापक संजय मोरे सर्व शक्ती सेना (सामाजिक संघटना) महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्ष नीरजजी सेठी साहेब (दिल्ली) यांनी नियुक्ती केली आहे. या प्रसंगी भारतीय दलित साहित्य अकादमी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर, सर्व शक्ति सेनेचे राष्ट्रीय महासचिव जय सुमनाक्षर आदी उपस्थित होते.
सर्व शक्ती सेना सामाजिक संघटन असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून या संघटनेचा मुख्य उद्देश भारत मातेचे संरक्षण व हिंदुत्ववादी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सोबत काम करणे आणि भारतीय संस्कृतीचे रक्षण करणे भारतातील सर्व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे असल्याची माहिती नवनियुक्त महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. राष्ट्रीय अध्यक्ष नीरज सेठी यांचे स्वप्न आणि इच्छा आहे की संपूर्ण भारत देश भ्रष्टाचार मुक्त व्हायला पाहिजे तोच संकल्प मी आज रोजी करतो कि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याचा मी प्रयत्न करीन महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना शासकीय केंद्रीय योजनांचा लाभ मिळवून देईल, असे आश्वासन प्रा.संजय मोरे यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये दौरे करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व शक्ती सेना यांचे संघटन मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करणार आहे त्याची सुरुवात माझे गाव सिंगनूर, ता. रावेर, जि. जळगाव येथून प्रथम सुरुवात करणार आहे, असेही ते म्हणाले.
त्याच प्रमाणे लॉकडाउन च्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यातील दलित ,आदिवासी गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान व जीवनावश्यक वस्तूंचे तसेच आर्थिक मदत कुटुंबासह जीवाची पर्वा न करता मदत केली.मी भारतीय दलित साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार महाराष्ट्र उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व करीत असून भाजप पक्षामध्ये संपूर्ण वेळ सक्रिय असून राष्ट्रीय, सामाजिक, क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे .माझ्या कार्याचा आढावा माननीय नीरजजी सेठी साहेब यांनी माझ्या कार्याचा लेखाजोगा घेऊन माझ्या कार्याची दखल घेत त्यांनी माझी सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड केलेली आहे. मी महापुरुषांना वंदन करून सर्व महापुरुषांना गुरु मानतो सर्व महापुरुष यांच्या जयंती निमित्ताने वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहितो.आज पावेतो मला जिल्हास्तरीय ,महाराष्ट्र राज्य पातळी ,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत हीच माझ्या कार्याची पावती म्हणून मला सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केली, त्याबद्दल नीरजजी सेठी साहेब सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर ,जय सुमनाक्षर सर्व शक्ति सेना राष्ट्रीय महासचिव यांचे आभार मानतो. या पत्रकार परिषदेला सुनोदा गावचे माजी सरपंच पंढरी भाऊ कोळी ,कृष्णा सावळे भारतीय दलित साहित्य अकादमी जिल्हा उपाध्यक्ष, प्रा. सुभाष सपकाळे, प्रा. सुनील तायड़े,सचिन सुरवाडे, प्रदीप शिरतुरे इत्यादी उपस्थित होते.