<
आपला भारत देश जगातील एक प्रगतीवर असणाऱ्या विकसनशील, उद्योगाची व्यापारपेठ, भविष्यातील तरुणांचा देश, विविध प्रयोगशील विज्ञानवादी देश, म्हणून आपला देश चंद्रावर जाऊन तेथे आता आपल्या देशाच्या प्रगतीचे अटकेपार झेंडे फडकवेल, असे आपण सहज बोलताना सुद्धा म्हणत असतो,ही बाब सत्य आहे. विज्ञानाच्या बळावर आपला देश हा जगातील प्रमुख बलशाली देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. आपण मंगळावर जाऊन तेथे वास्तव्य करू याचा काहीएक फरक पडत नाही. कारण आपल्या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे ते आता आपल्याला शक्य आहे. परंतु आपल्या देशाच्या भरभराटीसाठी, प्रगतीसाठी फक्त आपल्या देशातील पुरुषांच्याच वाटा आहे असे नाही तर आपल्या देशातील असंख्य महिला भगिनींची सुद्धा भरीव अशी प्रभाव पूर्ण कामगिरी आहे. देशाचा कारभार चालत असतांना त्यातील प्रत्येक विभागामध्ये महिला भगिनींनी केलेली प्रगती वाखाळण्याजोगी आहे. कारण त्या सुद्धा येथे तेवढ्याच पोटतीकडीने मेहनतीने प्रयत्न करीत आहेच. काही थोर समाजसुधारकांनी आपल्याला यांच्या कृतीयुक्त जीवनातून अत्यंत प्रेरणादायी जीवनपट आपल्यासमोर उभा केलाला आहे. महिलांना आपल्या देशात मान सन्मान मिळाला तो फक्त वंदनीय थोर व्यक्तिमत्व क्रांतीसुर्य विश्ववंदनीय महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारत देशातील पहिली मुलींची शाळा पुणे या शहरात सुरू केली यासाठी त्यांनी पहिली सुरुवात त्यांच्या धर्मपत्नी माता सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांना शिक्षणाचे धडे दिले. त्यानंतर त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली पण त्यावेळी मानवतेच्या विरुद्ध जगणार्या लोकांनी त्यांच्या या चांगल्या कामाला प्रचंड विरोध केला. पण महात्मा फुले यांनी स्वतःच्या मनाशी मुलींच्या शिक्षणाविषयी पक्का निर्णय घेतला होता. त्यामधून त्यांनी महिला व पुरुष यांच्यातील असणारा भेदभाव ,उच्चनीचता, याचा एक दिवस संपूर्ण नायनाट करायचा हा ध्येयवाद होता. हे त्यांचे ध्येय आज महिलांच्या प्रगतीला पाहून पूर्ण झालेले दिसून येत आहे. आजची स्त्री ही प्रत्येक कामात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. यामुळे आपल्या देशाची मान प्रगतीला अभिमानाने डोलत आहे.
परंतु काही ठिकाणी या बाबींना एक वेगळे वळण प्राप्त होते आणि तेथे जणू एका विध्वंसक समाजाचा घातक ठरणाऱ्या गोष्टींची पेरणीचा व्हायला जणू सुरुवात होते किंवा तसे दिसून येते या निर्णयामुळे काही वेळा आनंद उपभोगण्याचा तथा घेणार या कुटुंबाची भविष्याची वाट विनाशाकडे दिसते. ही गोष्ट लक्षात यायला फक्त त्या घरातील पुरुष मंडळी नाहीतर त्या कुटुंबातील स्त्रिया सुद्धा तेवढ्या जबाबदार असता असे मला वाटते कारण एखादी श्री एखाद्या स्त्रीचे मनाने किंवा तिचे मत किंवा तिच्या मनातील होणारी अविचल परिस्थिती समजून घेत नसेल तर तेव्हा त्या कुटुंबातील वरिष्ठ समजली जाणारी श्री सुद्धा त्याला जबाबदार असतेच असे मला वाटते आजच्या आजच्या समाजातील स्त्रीभ्रूणहत्येचा विचार केल्यावर त्याचे प्रमाण फारच वाढतांना दिसून येत आहे हीच बाब भविष्याचा विचार करून केली, तर घातक ठरणारी मूल्य समाज विध्वंसक करणारी असतीलच आजचे मुलगा-मुलगी जन्मदराचे गुणोत्तर पाहीले तर त्यामध्ये फारच तफावत दिसून येत आहे. याचा मागोवा घेतल्यास याला मुख्यत जबाबदार कोण? सूत्रधार कोण? यासंदर्भात खोलावर जाऊन तपास केल्यावर आपली सर्वच्या सर्व बोटे फक्त आणि फक्त आपल्याकडेच म्हणजे आपण ज्याला समाज म्हणतो त्याच्याकडे दिसतात जर आज मुलीचे लग्न करायचे म्हटले तर मुलगी चांगली शिकलेली गुणवान दिसायला सुंदर आहे पण तिच्या या चांगल्या बाबींकडे कोणीही लक्ष देत नाही. उलट्या मुलीचे वडील किती रुपये हुंडा देतील, याची प्रथमतः विचारणा केली जाते. येथे त्या मुलीच्या शिक्षणाचे किती महत्त्व आपण समजतो, याचा सुद्धा एक विचार करण्याची कल्पना आपल्या मनात यायला पाहिजे समजा मुलीच्या घराने तिचे शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा असते की ती एखादी उच्चपदस्थ नोकरदार व्हावी, पण तिच्या लग्नाच्या वेळेला तिच्या शिक्षणाचा पद्धतीपेक्षा तिचे वडील किती हुंडा देतील हे याची विचारणा करणारी मंडळींनी थोडाफार तरी वास्तविक तेचा विचार करणे आज गरजेचे आहे. आपण स्वतः समाजात एक सुशिक्षित समजदार व्यक्तिमत्व असताना आपणच समाजविघातक प्रवृत्तींना कुठेतरी शेवट केला पाहिजे. नाहीतर येणारा आपल्या पिढीचा भविष्यकाळ हा असा समाज घातक प्रथांमुळे अत्यंत वाईट स्वरूपाच्या मनाला खिन्न करणाऱ्या परिणामांना सामोरे जाऊ शकणार नाही उलट समाजातील विषमता वाढत जाईल यामुळे सामाजिक नुकसानाची कल्पना करणेसुद्धा आपल्या विचारसरणीच्या पलीकडे जाऊन बसेल असे वाटते यासाठी समाजाने अनिष्ट चालीरीती पेक्षा विवाह पद्धतीमध्ये व कौटुंबिक बाबींमध्ये मुलींच्या शिक्षणाला महत्त्व देऊन एक सामाजिक आदर्श निर्माण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. तेव्हाच विकास, विकसित ,विकासाभिमुख, आदर्शवत, समाज हा भावी पिढीला वाटेल असे आपण वागणे जरूरीचे आहे.
लेखक- प्रशांतराज सुपडू तायडे (सर)
मु. पो. कर्की ता.मुक्ताईनगर जिल्हा -जळगाव मो. नं.९६६५८३१५८१