Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तिवसा, मोर्शी, दर्यापूर येथील उपचार केंद्रे सुरू होणार; शहरातही खाटांची संख्या वाढवावी – विभागीय आयुक्त पीयुष सिंह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
तिवसा, मोर्शी, दर्यापूर येथील उपचार केंद्रे सुरू होणार; शहरातही खाटांची संख्या वाढवावी – विभागीय आयुक्त पीयुष सिंह

विभागीय आयुक्तांकडून कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

अमरावती, दि. २६ : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत तिवसा येथील ट्रॉमा केअर सेंटरसह मोर्शी व दर्यापूर येथेही उपचार केंद्रे सुरु होणार आहेत. शहरातही उपचारांसाठी आवश्यक रुग्णालये खासगी रुग्णालये आदी ठिकाणी खाटांची संख्या वाढवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकार, डॉ. काळे, डॉ. जयश्री नांदुरकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिकाधिक करावे. सध्या स्थानिक दोन्ही प्रयोगशाळांतून अहवाल प्राप्त होत आहेत. पुढे आवश्यकता भासल्यास अकोल्याहूनही अहवाल प्राप्त करून घेता येतील. ग्रामीण भागातही पुरेशा आरोग्य सुविधा उभाराव्यात व जनजागृती करावी, असे निर्देश श्री. सिंह यांनी दिले.

  तिवसा येथे 50, तसेच मोर्शी व दर्यापूर येथे प्रत्येकी 25 याप्रमाणे एकूण 100 खाटा वाढतील. खासगी रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्यात येईल. तिथेही साधारणत: 100 खाटा अतिरिक्त उपलब्ध होतील. सारीचे पेशंट वाढत असल्याचे दिसते. त्यामुळे यंत्रणा सुसज्ज करण्यात येत असल्याचे श्री. नवाल यांनी सांगितले.

नियमभंग करणा-यांवर पोलीस, महापालिका व इतर यंत्रणांकडून वेळोवेळी कार्यवाही होत आहे. आशासेविकांकडून सर्वेक्षणाचे कामही होत आहे.  यंत्रणेवरचा ताण वाढला असून, कर्मचा-यांतही बाधितांचे प्रमाण वाढत आहे. यादृष्टीने निर्बंध कडक व्हावेत किंवा कसे, याबाबतही सर्व परिस्थिती पुन्हा तपासून निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शहीद बडोले यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत

Next Post

सेवाशुल्कातील प्रस्तावित वाढ रद्द करावी! जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची मागणी

Next Post
सेवाशुल्कातील प्रस्तावित वाढ रद्द करावी! जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची मागणी

सेवाशुल्कातील प्रस्तावित वाढ रद्द करावी! जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d