<
जळगाव(प्रतिनीधी)- महामार्ग पोलीस केंद्र पाळधी येथे अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतुन “हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले आहे. प्रसंगी धरणगांव नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे श्री. देशमुख, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर, पाळधी पोलिस दुरक्षेत्राचे सपोनि.गणेश बुक, डॉ. जितेंद्र जैन, पाळधी तलाठी बालाजी लोंढे , मौलाना आझाद फाऊंडेशन अध्यक्ष फिरोज शेख, सामाजिक कार्यकर्ते चेतन निंबोळकर तसेच स्थानिक नागरीक आणि महामार्ग पोलीस केंद्र पाळधी कडील अंमलदार उपस्थित होते. हायवे मृत्युंजय दूत या योजनेबाबत उपस्थित मान्यवरांना प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र पाळधी सपोनी. सुनील मेढे यांनी योजना कशी राबविण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती दिली, तसेच सदरची योजना चांगल्या प्रकारे राबविण्याकरीता मदत आणि सहकार्य करण्याचे जनतेला महामार्ग पोलीस केंद्र पाळधी तर्फे आवाहन केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पो.ना. हेमंत महाडीक, प्रदिप नन्नवरे, पंकज बडगुजर, दिपक पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो.काँ. वसिम मलिक यांनी केले.