<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 4 – महिला व बालविकास विभागाच्या निर्णयानुसार 8 मार्च रोजी जागतीक महिला दिन जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.
महिला दिनाचे औचित्य साधुन जिल्हा प्रशासनाच्यावतीने वैयक्तिक (Individual activities) कृतीव्दारे 8 मार्च, 2021 पर्यंत नमुद कृतीमध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
स्त्रीभ्रूण हत्या एक सामाजिक समस्या निबंध स्पर्धा (150 शब्दात) (कार्यालयाच्या मेलवर पाठविणे)
महिला सक्षमीकरण काळाची गरज या विषयावर वक्तृत्व स्पर्धा (वैयक्तीक) 3 ते 5 मिनीटांची व्हीडीओ क्लीप तयार करुन पाठवणे, महिला दिन या विषयावर कविता/लेखन व्हीडीओ किंवा मेल पाठविणे, महिला दिन या विषयावर घोषवाक्य तयार करणे, महिला दिन या विषयावर चित्र काढणे, जागतिक महिला दिन प्रतिज्ञा, वरील वैयक्तीक कृती करुन दिलेल्या मेलवर व तालुकानिहाय व्हाटस्ॲप नंबरवर स्पर्धकाचे नाव, पत्ता, मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांकासह पाठविण्यात यावे. एका स्पर्धकास एकाच कृतीत सहभाग घेता येईल व एकाच कृतीचा फोटो सादर करता येईल
श्रीमती आरती साळुंके – जळगाव शहर – 9403479788, श्री महेद्र बेलदार – जळगाव ग्रा – 8693875656, श्री प्रतिक पाटील – भुसावळ/बोदवड – 9881169333, श्रीमती योगिता चौधरी – अंमळनेर – 9860036634, श्रीमती रिटा भंगाळे – चोपडा – 9970457432, श्री. चंद्रशेखर सपकाळे – धरणगाव – 9890091943, श्री. मिलींद जगताप – रावेर – 9822218651, श्री. विशाल ठोसर- जामनेर -8805123302, श्री. राजु बागुल – पारोळा – 9893190867, श्रीमती उर्मिला बच्छाव – एरंडोल – 8983137631, श्री. प्रशांत तायडे – मुक्ताईनगर- 9421708292, श्री. सुदर्शन पाटील – भडगाव/चाळीसगाव – 7588646690, आशिष पवार – पाचोरा – 7875202581 यावरही पाठवावे. तसेच कार्यालयाचा ई मेल – [email protected] वर पाठवावे.
चांगल्या वैयक्तीक कृतीची प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक निवड करुन जिल्हा व तालुका प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात येईल. सदर सर्व कृती ही वैयक्तिक स्वरुपाची असून कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेवून मास्क व सोशल डिस्टन्सिंग इ. सर्व मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.