<
जळगांव(चेतन निंबोळकर)- जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास व्हावा, इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत टिकाव्यात म्हणून अक्षरशः स्वतःच्या दोन्ही मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करून नाविन्यपूर्ण प्रयोगातून स्वतःला वाहून घेणारे किशोर पाटील कुंझरकर यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असून राज्यभर त्यांनी शैक्षणिक सामाजिक कार्याची चळवळ उभी केली आहे. चाळीसगाव तालुक्यात शेवटच्या टोकावर असलेले कुंझर हे गाव. आपल्या शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक चळवळीतील योगदानातून चर्चेत आणण्याचे काम गावाचे भूमिपुत्र किशोर पाटील कुंझरकर यांनी केले असून चाळीसगाव तालुक्याचे नाव लौकिक राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेत आपला प्रभावीपणे ठसा उमटवला आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणून कार्य करीत असताना स्वतःच्या दोन्ही मुलांना इयत्ता पहिलीपासून जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करून राज्यात सर्वप्रथम स्वेच्छेने जिल्हापरिषदेची शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकावी व शाळा टिकाव्यात यासाठी ग्रामीण भागातील पालकांचा स्वतःची मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकण्याचा कल हेरून त्यांना जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे दालन त्यांनी सुरू करून दिले.त्याच जोडीने या विषयावर कृती संशोधन केले असता त्यांच्या कृषी संशोधनाची निवड महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे व शासनाने घेत सेमी इंग्रजी माध्यमांना पुस्तके पुरवण्याचे व सेमी इंग्रजी माध्यम सर्व अवलंबण्याचे धोरण स्वीकारले ही तालुक्याच्या व जिल्ह्याच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे. जळगाव जिल्हा परिषदेने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला त्याच वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा मानही किशोर पाटील कुंझरकर यांना मिळाला. ही राज्याच्या इतिहासातील पहिली लक्षणीय घटना होईल,राज्य शासनाच्या पुरस्कारानंतर तत्कालीन खासदार ए टी नाना पाटील आमदार उन्मेश दादा पाटील शिक्षण सभापती पोप ट तात्या भो,अधिकारी पंचायत समिती सभापती स्पितल बोरसे उपसभापती सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत संपूर्ण कुंझर गावाने एकत्र येऊनया भूमिपुत्रांची वाजत गाजत डीजेच्या तालावर घोड्यावरून मिरवणूक काढली घरोघरी औक्षन झाले,एखाद्या शिक्षकाला गावाने गावाचे भूषण म्हणून गौरवने ही पहिली घटना कुंझर गावाच्या माध्यमातून किशोर पाटील यांच्या रूपाने घडली. त्याच दिवशी आमदार खासदार यांच्या उपस्थितीत आमदार उन्मेश दादा पाटील यांचे शुभहस्तेगावाने कुंझर भूषण सन्मानपत्र देऊन परिवारासह या समाजाभिमुख शिक्षकांचा गौरव केला.मित्रांच्या सुखदुःखात सहभागी होणे हा मूळ स्वभाव आणि सर्जनशीलता आणि प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी मदत करणे हा त्यांच्या अंगी असलेला गुण आहे. चाळीसगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचा जेव्हा जेव्हा विचार पुढे येतो तेव्हा कुंझरकर सर हे नाव पुढे येते.मास्टर ऑफ जर्नालिझम पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर अनेक संधी चालून आल्यावरही शिक्षकी पेशा स्वीकारून थोर समाज सुधारक यांचा वारसा जपण्याचे काम त्यांनी आपल्या कृतीतून सुरू ठेवलेले आहे.आपल्या वडिलांच्या निधना नंतर कुंझर गावाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भव्य प्रवेशद्वार त्यांनी बांधून दिले आहे.जलयुक्त शिवार पाणी फाउंडेशन पूरग्रस्तांना मदत यासह अनेक समाजाभिमुख योजनेत त्यांचा सातत्याने पुढाकार असतो.गाव तेथे व्यायाम शाळा, गाव तेथे ग्रंथालय,गाव तेथे शाश्वत विकासाच्या योजना पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते सातत्याने पुढाकार घेताना दिसत आहे. प्रत्येक वेळी आपल्या नावाच्या पुढे गावाचे नाव लावणे हा त्यांचा छंद त्यांच्या अनेक पुरस्कारांच्या माध्यमातून गावाचे नाव पुढे करणे यामुळे गावाची एक चांगली ओळख राज्यभर करण्यात त्यांनी यश संपादन केले आहे. राज्यातील शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक, पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असल्याकारणाने प्रत्येक क्षेत्रात गावाचे नाव पुढे करून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले.किशोर पाटील कुंझरकर हे सध्या एरंडोल तालुक्यात प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत असून आपल्या चाळीसगाव तालुक्याची व मूळ गावाशी त्यांनी नाळ जोडून ठेवली असून सर्वांना हवाहवासा चेहरा म्हणून पुढे आले आहे. महाराष्ट्र शासन टाटा ट्रस्ट व शालेय शिक्षण विभागाच्या वतीने इंग्रजी विषयाच्या विकासासाठी शिक्षकांसाठी राबविण्यात येणाऱ्या तेजस प्रकल्पांसाठी शिक्षकांमधून ऑनलाइन मुलाखतीद्वारे ब्रिटीश कौन्सिल द्वारा तेजस टॅग कॉर्डिनेटर म्हणून देखील त्यांची निवड झाली आहे.दर महिन्याच्या बुधवारी ते एरंडोल तालुक्यातील शिक्षकांना केंद्रनिहाय इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण देतात.महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या समता विभागांतर्गत एरंडोल तालुका बालरक्षक म्हणून देखील त्यांची निवड झाली आहे.औदुंबर साहित्य रसिक मंचच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देण्यात आले असून डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच विविध संस्थांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.