<
नाशिक-(प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते व हिंदी भाषिक संघटनेचे प्रमुख राजकुमार जेफ यांची राष्ट्रीय किसान संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राजस्थानचे उप-मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या आदेशानुसार चौधरी रामकेश गुर्जर यांनी राजेश पायलट किसान संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडी बद्दल नाशिक शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर,माजी मंत्री शोभा बच्छाव,माजी आमदार जयप्रकाश छाजेड,मनपा गटनेते शाहू खैरे,नगरसेविका वत्सला खैरे,ओबीसी विभगाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय राऊत,ब्रिजमोहन टूर्सचे संचालक ब्रिजमोहन चौधरी ,लोगो पायलट राकेश जेफ,अनिल कोठुळे,संतोष ठाकूर,कैलास सैनी,ऑल इंडिया सैनी सेवा समाज संस्थेचे सरचिटणीस पी.एम.सैनी,डी.एल शर्मा,ज्युली डीझुजा,कुसुमताई चव्हाण यांनी अभिनंदन केले.
जेफ यांनी देशांत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त असून त्यांच्या न्याय हक्कासाठी किसान ,मजदुरांच्या प्रश्नासाठी काम करणार असल्याचे अभिवचन देण्यात आले असून लवकरच प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करणार असल्याची माहिती दिली