<
पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक – मनोज पाटील
जळगांव(चेतन निंबोळकर)- शिव कॉलनी येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत विद्यार्थ्यांना शाळू माती गणपती प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न तसेच चिमुकल्यानी ५० विविध रुपात गणपतीची मूर्ती बनविले.
कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.असे ग.स.सोसायटीचे अध्यक्ष श्री. मनोज पाटील सर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले
गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्यानं तो कटाक्षाने टाळायला हवा. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठय़ा आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते, त्यामुळे त्याचाही आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे मनोगत मौलाना आझाद अल्पसंख्याक फौंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख यांनी व्यक्त केले.
या वेळी विद्यार्थ्यांनी शाळू मातीचे गणपती बनवले व उत्कृष्ट गणपती म्हणून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
मुख्यध्यापिका सौ. वसाने मॅडम, सौ.ब्राह्मणकर मॅडम,सौ.भारंबे मॅडम,सुदर्शन पाटील,आदि उपस्थित होते
या उपक्रमाचे आयोजन सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले.