<
जळगाव – (प्रतिनिधी) – पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अपघाती मृत्यू झाल्यास व अपंगत्व आल्यास राजीव गांधी सानुग्रह विद्यार्थी अपघात सानुग्रह विमा योजनेतून त्यांना ५०ते ७५ हजार रूपये पर्यंत ची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गतजिल्हातील २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील राजीव गांधी सानुग्रह अनुदानासाठी जिल्हाभरातून आलेले जवळपास 21प्रस्ताव शिक्षण विभागात दाखल होऊन प्रलंबित होते. त्यासंदर्भात मी दि. 22ऑक्टोबरला जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांना निवेदन दिले.व लवकर मीटिंग घेऊन पुणे संचनालयाला प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली.साहेबांनी लगेच 2दिवसात बैठक घेऊन प्रस्ताव सादर केला. त्यानंतर जवळपास मग 4महिने त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला. व 13मार्चला अनुदान जाहीर झाले.
या योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आलेले 21 विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यृ झाला होता. यामध्ये पाण्यात बुडून, संर्पदंशाने तसेच अपघाताने झालेल्या विद्यार्थांचा समावेश होता. आज त्या सर्व लाभार्थ्यांना जिल्हा परिषदला बोलवून त्यांना प्रति 75 हजार रु असे एकूण 21लाभार्थ्यांना एकूण 15 लाख 75 हजार रूपयांचे अनुदानाचा धनादेश आज सदरील कुटूंबास वाटप केला. यावेळी तेथील या योजनेच्या प्रमुख श्रीमती बैसाणे मॅडम उपस्थित होत्या.
सदर कामाचा पाठपुरावा करताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब व बैसणे मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले त्याबद्दल जिल्हाधिकारी मा. अभिजित राऊत साहेब व बैसाणे मॅडम यांचे विशेष आभार दिव्या भोसले यांनी मानले आहे .