<
जळगांव-(प्रतिनिधी)- दि.२५ मार्च २०२१ रोजी निवडणूक अधिकारी यांच्या कडून बांभोरी प्र.चा. ता.धरणगाव येथील ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक जाहीर झाली असून येथील सचिन यशवंत बिऱ्हाडे हे बांभोरी प्र.चा. ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहे. ते एकमेव अनुसूचित जाती मधून लोकशाही प्रक्रियेने निवडून आलेला असून, या वर्षी बांभोरी प्र.चा. ग्रामपंचायत सरपंच सोडत ही अनुसूचित जाती साठी राखीव असल्यामुळे अनु.जातीचे सचिन यशवंत बिऱ्हाडे हे एकमेव उमेदवारी अर्ज भरणार आहे. मागील महिन्यात दिनांक १३ रोजी अर्ज भरण्याच्या दिवशी भारतीय संविधानाला काळिमा फासणारी घटना घडली होती, त्या दिवशी त्या मागासवर्गीय उमेदवाराने अर्ज भरू नये म्हणून त्यांच्या विरोधकांनी सचिन बिऱ्हाडे यांना पोलीस सरंक्षण मध्ये असून देखील त्यांच्यावर व पोलिसांवर हल्ला करून त्याचे अपहरण केले होते आणि त्याला जबर मारहाण करुन त्याला अर्ज सादर करू दिला नव्हता. हा जाती वादाला वाव देणारा आणि समाजात अशांतता निर्माण करणारा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन च्या वतीने या प्रकरणात आपण वैयक्तिक लक्ष घालून त्याला पोलीस संरक्षण मिळण्यात यावं आणि सचिन बिऱ्हाडे यांना अर्ज सादर केल्यानंतर सुद्धा त्याच्यासह परिवाराला पोलीस सरंक्षण कायम ठेवण्यात यावं, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने अँड. अभिजीत रंधे, दिपक सपकाळे, रोहन महाजन यांनी दिलेआहे.