<
बोदवड :- (अमित जैन ) संपूर्ण महाराष्ट्रात कोवीड रुग्णांची संख्या वाढत आहे, शासनातर्फे तहसील कार्यालय, नगरपंचायत, आरोग्य विभाग, डॉक्टर असोसिएशन बोदवड यांच्या संयुक्त विद्यमानाने कोवीड तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार करणे या उद्देशाने बोदवड शहरात 22मार्च, 23मार्च, 24मार्च या या तीन दिवशी कॅम्पचे आयोजन केलेले आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यास डॉक्टरांच्या सहीचे प्रमाणपत्र दिले जाते. या तीन दिवसाच्या कालावधीत सर्व डॉक्टर आपले दवाखाने बंद ठेवून या शिबिरात सेवा देत आहे.