<
भडगाव – (प्रतिनिधी) – तांदुळवाडी, मळगाव, भोरटेक ,उंबरखेड ,हिंगोने परिसरसह अवकाळी वादळ पाऊस हलकासी गारपीट झाल्याने मातीत सोन पिकवणाऱ्या शेतकरी राजाचे अतोनात नुकसान झाले आहे.
त्यात सतत संकटात तोंड देऊन करोना सारख्या महामारी रोगाचा प्रादूर्भाव संपुर्ण जगात असुन संपुर्ण देश भयभयीत झालेले दिसुन येत आहे ,पण रात्रंदिवस करणारा कष्टाळू मातीतून सोन पिकवणारा शेतकरी राजाने संकटाला तोंड देऊन वेळोवेळी अन्नधान्य पुरवणारा शेतकरी राजा आज संकटात सापडलेल्या आहे ,
तांदुळवाडी परिसरसह सर्वात जास्त प्रमाणात असलेले मका ,गहु ,ज्वारी-बाजरी हरभरा ,ऊस शाळू इ.पिकांचे जमीनदस्त झालेले दिसून येत आहेत त्यात वादळामुळे मोठे मोठे झाडे उन्मळून पडलेले आहेत,तोंडातला घास येण्याअगोदर अवकाळी वरूनराजने शेतकऱ्याला मोठ्या संकटात नेले आहे .तरी काही शेतकऱ्याने अश्रु अनावरण देखील केले.
तरी परिसरातील तलाठी, तहसीलदार ,प्रांत व पाचोरा भडगाव विधानसभातील आमदार किशोर अप्पा पाटील, शेतकऱ्यांचे वाली पालकमंत्री गुलाबराव पाटील .यांनी तात्काळ निर्णय देऊन सरसकट पंचनामा करण्यात यावे ,अशी मागणी संकटात सापडलेला परिसरातील शेतकरी वर्ग करत आहे.