Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिने दस्त नोंदणीस राहणार सवलत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिने दस्त नोंदणीस राहणार सवलत

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 – राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत 31 मार्च, 2021 रोजी संपत असल्याने जिल्ह्यातील नोंदणी कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन पोलीस व प्रशासनाकडून केले जात असून दुसरीकडे सवलतीची मुदत संपत असल्याने गर्दी होऊ नये व लोकांना सवलतीचा फायदा घेता यावा, यासाठी 31 मार्च, 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क भरा आणि पुढील चार महिन्यात कधीही दस्त नोंदणी करण्याचा पर्याय नागरिकांना देण्यात आला आहे.

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गतवषी खरेदीदारांना मालमत्तांच्या व्यवहारांसाठी प्रोत्साहन देऊन रिअल इस्टेटलाही चालना देण्यासाठी 1 सप्टेंबरपासून 31 डिसेंबर पर्यंत मुद्रांक शुल्कात 3 टक्के तर 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत 2 टक्के सवलत दिली आहे.

पहिल्या टप्यातील सवलत योजनेला संपुर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यातही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. सवलतीचा दुसरा टप्पा 31 मार्चला संपत असल्याने नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासुन दस्त नोंदणीसाठी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. कोरोना परिस्थिती असल्याने गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून वारंवार आवाहन केले जात असतांना केवळ सवलत योजनेची मुदत संपत असल्याने दस्त नोंदणी कार्यालये दस्त नोंदणीसाठी गजबजलेली पाहायला मिळत आहे.

या सवलतीचा आता खरेदी–विक्री तसेच बक्षीसपत्र करु इच्छिणाऱ्यांना लाभ होणार असुन 31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरुन ज्या दिवशी मुद्रांक शुल्क भरले आहे तेथुन पुढील 4 महिन्यांमध्ये दस्तनोंदणी करता येणार असल्याने याचा विशेषत्वाने फायदा घ्यावा. तसेच नागरिकांनी आता मुद्रांक शुल्काचा भरणा केल्यास पुढील चार महिन्यात त्यांना दस्त नोंदणी करताना सध्याच्या सवलतीचा फायदा घेता येऊ शकेल.

तरी नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी गर्दी करु नये व कोव्हीडपासून आपले तसेच इतराचेही संरक्षण करावे, सुचनांचे पालन करावे. असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा, मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लाॅकडाऊनचा विचार-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा इशारा

Next Post

तांदुळवाडी , अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात

Next Post
तांदुळवाडी , अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात

तांदुळवाडी , अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d