<
उस्मानाबाद-( प्रतिनिधी) – येथे २० व २१ मार्च ला झालेल्या महाराष्ट्र स्टेट आय एम ए महास्पोर्ट मध्ये जळगाव ima ने विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत यश मिळवले. आय एम ए जळगाव क्रिकेट संघाने साखळी सामन्यात मुंबई, अमरावती, सातारा संघाला पराभूत केले.सेमी फायनलमध्ये अमरावती स्टार ने त्याना हरवले. जळगाव आय एम ए संघाचा खेळाडू डॉ विनोद पवार यांनी फलंदाजी करताना ४ सामन्यात सर्वाधिक १६४ धावा केल्या.व त्यांनी मॅन ऑफ द सिरिज चा पुरस्कार मिळवला.तसेच क्रिकेट संघात डॉ पंकज गुजर, डॉ माजीद खान, डॉ दिलीप महाजन, डॉ सुशिल राणे, डॉ सचिन देशमुख, डॉ मनिष चौधरी, डॉ दिपक जाधव, डॉ पराग नाहटा, डॉ प्रशांत पाटील, डॉ जितेंद्र नारखेडे, डॉ जितेंद्र कोल्हे यांनी सहभाग घेतला. बॅडमिंटन मध्ये डॉ. वृशाली पाटील यांना महिला डबल ओपन 45 मध्ये सुवर्ण पदक मिळाले, मिक्स डबल ओपन 45 सुवर्ण पदक मिळाले.महिला सिंगल रौप्य पदक मिळाले.पुरुष बॅडमिंटन मध्ये डॉ संदीप पाटील, डॉ समीर चौधरी यांनी पुरुष डबल मध्ये सेमीफायनल पर्यंत मजल मारली.व उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.तसेच कॅरम स्पर्धेत डॉ अनघा चोपडे यांना महिला डबल मध्ये सुवर्ण पदक मिळाले. महिला सिंगल मध्ये रौप्य पदक मिळाले.सहभागी सर्व डॉ खेळाडूंचं सचिव डॉ स्नेहल फेगडे, अध्यक्ष डॉ दिपक पाटील व आय एम ए जळगाव पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.