<
प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी अंतर्गत शेळेगाव येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या धर्तीवर आधारित मोहिमेमध्ये शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका त्यांच्याद्वारे घरोघरी जाऊन संशयित कोविड रुग्ण शोधमोहीम राबविली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी अंतर्गत एकूण 47 टीमची नेमणूक तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.
सदर सर्वेक्षण मोहिमेस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत,डॉ.मनोज तेली,डॉ.आश्विनी वाघ,तालुका मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच.माळी यांच्या पथकाने भेट दिली.
सर्वेक्षण टीममध्ये आरोग्य सेविका दुर्गा चौधरी, शिक्षक युवराज सुरळकर,अंगणवाडी सेविका प्रतिभा परदेशी,शीतल बोऱ्हाडे, आशा स्वयंसेविका सविता पाटील उपस्थित होत्या.