<
जामनेर/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे ३१/०३/२०२१(बुधवार) आज रोजी संपुर्ण महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या दिव्यांग हक्क अधिनियमांतर्गत राखीव ५% निधीचा दिव्यांगांना लाभ होणे अपेक्षित असतांना तालुक्यातील ग्रामपंचायत संस्थांकडून दिव्यांग कल्याणसाठी निधी खर्च केल्याचे दिसत नाही. यासाठी ग्रामसेवकांची बैठक बोलावून दिव्यांग बांधवाच्या हक्काचा ५% निधी लवकरात लवकर मिळावा या संदर्भातचे निवेदन युवासेना जामनेर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गटविकास अधिकारी (कवाड देवी) जामनेर पंचायत समिती येथे देण्यात आले.
या प्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील, युवासेना तालुका प्रमुख विशालभाऊ लामखेडे,शिवसेना शहर प्रमुख उत्तर जामनेर अतुलभाऊ सोनवणे,शहर प्रमुख दक्षिण जामनेर ज्ञानेश्वरभाऊ जंजाळ,शेंदुर्णी शहर प्रमुख विलासभाऊ पाटील,उपतालुका संघटक सुधाकरशेठ सराफ,माजी शहर प्रमुख,जामनेर पवनभाऊ माळी,युवासेना प्रसिद्धी प्रमुख मुकेशभाऊ जाधव व तालुक्यातून आलेले दिव्यांग बंधु-भगिनी उपस्थित होते.