<
बाजार परिसरात कुठेही पालिका प्रशासन किंवा पोलीस अधिकारी कर्मचारी लोकांना आवाहन करताना दिसले नाहीत
नाशिक – (सिद्धार्थ तेजाळे)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मिनी लॉक डाऊनची घोषणा केली. तसेच ‘ब्रेक दि चेन’ ही विशेष मोहीम हाती घेतली, मात्र आज अनेक ठिकाणी शासनाचे निर्देशांचे पालन असताना दिसले नाही.
विशेष करून मेनरोडच्या मागील भाग, रविवार कारंजा, बहोर पट्टी, भद्रकाली बाजार तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. जी दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहे ते तर सुरूच आहे मात्र त्याशिवाय देखील हातगाडीवाले तसेच उघड्यावर विक्री करणारे लोक देखील आपले साहित्य विक्री करताना दिसत आहे. तसेच वाहनांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात दिसून आली.
पोलिस प्रशासनाच्या वतीने रात्री शहरातील विविध भागात लोखंडी जाळ्या लावून मार्ग बंद केली होती, मात्र आज सकाळी बाराच्या दरम्यान हे सगळे बलोखंडी जाळ्या बाजूला करण्यात आल्याचे दिसून आले तर संपूर्ण बाजार परिसरात कुठेही पालिका प्रशासन किंवा पोलीस अधिकारी कर्मचारी लोकांना आवाहन करताना दिसले नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर करोनावर आपण कशी मात करणार अशी चिंता जाणकारांनी व्यक्त केली आहे.