<
३०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर लवकरच कार्यान्वित होणार
नाशिक- (सिद्धार्थ तेजाळे) – नाशिक शहरात कोरोना संसर्ग रोगाची परिस्थिती भीषण होतअसल्याने ठक्कर डोम येथे नव्याने तयार करण्यात येत असलेल्या कोविड केअर सेंटरची आज (दि ६ एप्रिल)(Covid Care Center) पाहणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली.
नाशिक शहरात कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रोज जवळपास अडीच ते तीन हजार रुग्ण दररोज बाधित होत आहे त्या कारणाने शहरात नाशिक महानगरपालिकेच्या व खाजगी हॉस्पिटल यांच्या बेडची संख्या अपुरी पडत असून नागरिकांचे बेड उपलब्धतेबाबत सातत्याने दुरध्वनी येत असल्याने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने ठक्कर डोम येथे नव्याने ३०० खाटांचे कोवीड केअर सेंटर (Covid Care Center) करण्यात येत असून त्या कामाची पाहणी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी केली त्यांच्या समवेत नाशिक पूर्व चे आमदार राहुल ढिकले नाशिक मनपाचे सभागृहनेते सतीश बापू सोनवणे हे उपस्थित होते.
ठक्कर डोम येथील ३०० खाटांचे कोविड केअर सेंटरचे (Covid Care Center) काम अतिशय वेगाने सुरू असून येत्या तीन ते चार दिवसात काम पूर्ण होऊन या ठिकाणी बाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी ठेवण्याची व्यवस्था कार्यान्वित होणार आहे त्यामुळे तीनशे रुग्णांना या ठिकाणी उपचार घेता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिकेतर्फे समाज कल्याण व पंचवटी भागातील मेरी येथील पंजाबराव देशमुख वसतीगृह येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून नाशिक शहरातील रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन चे बेड उपलब्ध होत नसल्याचे सातत्याने माननीय महापौर यांच्याकडे दूरध्वनी येत असल्याने त्या अनुषंगाने सदरचा पाहणी दौरा आयोजित केला होता. आजमितीस महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे १५ व नवीन बिटको हॉस्पिटल येथे २१ असे एकूण ३६ व्हेंटिलेटर बेड कार्यान्वित असून झाकीर हुसेन येथे ९४ ऑक्सीजन बेड व नवीन बिटको हॉस्पिटल येथे 205 ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहे. सध्या ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने नवीन बिटको हॉस्पिटल येथे नव्याने २०० ऑक्सीजन बेड रुग्णांना उपलब्ध करून देण्याबाबत तातडीची कार्यवाही सुरू असून त्यापैकी ६० ऑक्सिजन बेड सुरु करण्यात आले असुन उर्वरीत बेडचे कामही लवकरच पुर्ण होणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.
शहरातील नागरिकांनी या परिस्थितीत घाबरून न जाता संयम ठेवावा वेळप्रसंगी आयुर्वेदिक औषधे व होमिओपॅथीचे औषधे घेतल्यास प्रतिकारशक्ती निर्माण होऊन रुग्ण संख्या आटोक्यात येणार असल्याने याही उपचाराचा अवलंब वैदयकीय सल्याने करावा नाशिक महानगरपालिका ही शहरातील पालकसंस्था असून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत असून नागरिकांनी संयम ठेवून नाशिक महानगरपालिकेला सहकार्य करावे नाशिक महानगरपालिका प्रशासन व पदाधिकारी सातत्याने प्रयत्नशील राहून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे नागरिकांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे व नाशिक शहर कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी केले आहे.