<
नाशिक –( सिद्धार्थ तेजाळे) –
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा बाधितांचा आकडा कमी होत नाही असे दिसत आहे. आजही नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ४ हजाराच्या वर आहे आज कोरोनामुळे जिल्ह्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात सातत्याने रुग्ण वाढ होते आहे. त्यामुळे नागरीकांनी स्वतःबरोबर इतरांची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडा ,मास्क वापरा,नियमित हात स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर पाळा.
आज जिल्ह्यात कोरोनाचे ४१२२ नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर नाशिक शहरात आज कोरोना २३७९ नवे रुग्ण आढळले आहेत.शहरात वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्ये मुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २३७९ तर ग्रामीण भागात १५५८ मालेगाव मनपा विभागात ९३ तर बाह्य ९२ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ३८०० संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३८५६ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ इतके झाले तर शहरात हा रेट ८४.१५ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३२४१० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १९७२५ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ४६२३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे २४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ८३.०५ %,नाशिक शहरात ८४.१५%, मालेगाव मध्ये ७६.२१% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८७.४५ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ %इतके आहे.
आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – २४
नाशिक महानगरपालिका-११
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-०९
जिल्हा बाह्य-०४
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २५५३
नाशिक शहरात एकूण मृत्यू – १२१४
नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ७:३०वा पर्यंत)(Corona Update)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०६
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३४०६
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- २७
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –५९
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३०२